Rakhi Sawant in Bigg Boss Season 6 : ‘बिग बॉस’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री, राखी सावंतचा खेळ रंगणार, स्पर्धकांमध्ये वाढली धाकधूक

ही वाइल्ड कार्ड एन्ट्री खास असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Rakhi Sawant in Bigg Boss Season 6 : ‘बिग बॉस’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री, राखी सावंतचा खेळ रंगणार, स्पर्धकांमध्ये वाढली धाकधूक

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या मराठी बिग बॉस मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या 'बिग बॉस' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ही वाइल्ड कार्ड एन्ट्री खास असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

अभिनेत्री  राखी सावंतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस अधिक रंजक होणार असून, प्रेक्षकांना राखी सावंतचा जलवा पहायला मिळणार आहे.राखी या शोमध्ये काय धमाल करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – Best Bus For Students : आता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचण नाही, विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट'चा मोठा निर्णय 

नुकताच 'बिग बॉस'चा प्रोमो समोर आला. यावेळी राखी सावंत म्हणाली की, "राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा तिथे तिचीच मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला बिग बॉसच्या घरात मला पाहाता येणार आहे."

हेही वाचा – India Vs Pakistan Match: काय घडलं लाहोरच्या 'त्या' गुप्त बैठकीत? भारत-पाकिस्तान मॅचबद्दल मोठी अपडेट समोर

राखी सावंतचा स्वभाव बेधडक आहे. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा देखील बदलते, राखी सावंतची आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्यानं प्रेक्षकांच्या मनात आता या शो बद्दल आणखी उत्सुकता निर्माण होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number