टार्गेटवर टायगर श्रॉफ नव्हतातच, तर…; आरोपीच्या स्टेटमेंटने धक्कादायक खुलासा! शिकार होता भलताच मोठा व्यक्ती

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आली आहे. हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हतातच, असा मोठा खुलासा आरोपींच्या प्राथमिक चौकशीत झाला आहे.
Tiger Shroff Firring
Tiger Shroff Firring

रविवारी अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिस आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या मदतीने राजस्थानच्या कोटामधून तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अशातच टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आली आहे.

हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हतातच, असा मोठा खुलासा आरोपींच्या प्राथमिक चौकशीत झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत एका मोठ्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते. आरोपींना आधी ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज न पोहोचता आल्याने त्यांनी टायगर श्रॉफवर हल्ला केल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. यावेळी टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो हे त्याच्या चाहत्यांच्या रील्सवरून कळल्याने टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आले.

हेही वाचा- मोठी बातमी! महिनाभर रेकी, दोन शस्त्रांचा वापर; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवे तपशील समोर

श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरून हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफच्या मुव्हमेंट ट्रेस केल्या होत्या. तसेच बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी टायगर श्रॉफ याला थेट जीवे मारायचे ठरवले असं आरोपींनी पोलीस चौकशीत सांगतिले. मात्र टायगर नाही तर ती दुसरी व्यक्ती कोण? अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दोन शस्त्रांचा वापर, पण शस्त्रे गायब
पोलीस तपासानुसार, या गोळीबारासाठी दोन वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, राजस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडून अद्याप एकही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. तिन्ही आरोपींना घेऊन मुंबई पोलीस मुंबईत दाखल झाल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता असून या प्रकरणाचा हेर कोण आहे, याचा शोध सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version