मोठी बातमी! महिनाभर रेकी, दोन शस्त्रांचा वापर; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवे तपशील समोर

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील फुटबॉल मैदानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत.

मोठी बातमी! महिनाभर रेकी, दोन शस्त्रांचा वापर; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवे तपशील समोर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील फुटबॉल मैदानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. तीनही आरोपींना राजस्थानमधून मुंबईकडे आणले जात असतानाच या प्रकरणाची आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपींनी महिनाभर रेकी केल्याचा संशय
प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी टायगर श्रॉफच्या जुहू येथील फुटबॉल मैदानाची सुमारे महिनाभर रेकी केली होती. टायगरच्या रोजच्या हालचाली आणि मैदानावर येण्याच्या वेळेची माहिती त्यांना कोणी पुरवली, याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

11 ऑक्टोबरलाच पहिला प्रयत्न फसला
तिन्ही संशयित आरोपी 11 ऑक्टोबरलाही जुहूच्या मैदानावर आले होते. मात्र त्या दिवशी टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी आलाच नाही, त्यामुळे त्यांचा डाव फसला आणि ते परत गेले, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हल्ल्याच्या दिवशी अडीच तास प्रतीक्षा
यानंतर आठवड्याभराने, 18 ऑक्टोबरला आरोपी पुन्हा मैदानावर आले. CCTV तपासातून समोर आले आहे की, आरोपी दुपारी सुमारे 4:30 वाजताच मैदानाजवळ पोहोचले होते. टायगर मैदानात आहे का, हे पाहण्यासाठी ते वारंवार प्रवेशद्वाराजवळ येत-जात होते. तब्बल अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर संध्याकाळी सुमारे 7 वाजता टायगर मैदानाबाहेर येताच त्यांनी गोळीबार केला.

दोन शस्त्रांचा वापर, पण शस्त्रे गायब
पोलीस तपासानुसार, या गोळीबारासाठी दोन वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, राजस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडून अद्याप एकही शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही.

तिन्ही आरोपींना घेऊन मुंबई पोलीस मुंबईत दाखल झाल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता असून या प्रकरणाचा हेर कोण आहे, याचा शोध सुरू आहे.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

 

 

 

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number