मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ

मिरज तालुक्यातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.

मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ

मिरज तालुक्यातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. गुंडेवाडी येथे एका 30 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव सुनील तानाजी खांडेकर असे आहे.

काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खांडेकर सोमवारी सायंकाळी शेतात गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर चाकूने गंभीर वार केले. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ अवस्थेत जागीच कोसळले.

हेही वाचा – मोठी अपडेट! उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी करमाळ्यातील नवनाथ झोळ पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरा बारामतीत दाखल

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने धाव घेत त्यांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

दरम्यान, या खुनामागचे नेमके कारण काय? हा वैयक्तिक वादातून झालेला हल्ला आहे की पूर्ववैमनस्यातून? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून आरोपी फरार आहेत. मिरज ग्रामीण पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number