Actor Rohan Gujar Baby Photos: ‘होणार सून मी ह्या घरची’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेत जान्हवीच्या भावाची म्हणजेच ‘पिंट्या’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रोहन गुजर लग्नाच्या 8 वर्षांनंतर बाबा झाला आहे. रोहनची पत्नी स्नेहल हिने एका गोंडस मुलाला आणि मुलीला अशा दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये या जोडप्याने आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये त्यांनी बाळांच्या हाताची पहिली झलक दाखवली होती, आणि आता 19 ऑक्टोबर रोजी अभिनेत्याने दोन्ही मुलांचे चेहरे दाखवून चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला आहे.
जुळ्या मुलांची गोड झलक दाखवत अभिनेत्याने लिहिली खास पोस्ट
रोहन गुजरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन अत्यंत सुंदर फोटो दिसत आहेत, ज्यातील पहिल्या फोटोत दोन्ही मुले खिडकीजवळ बसून बाहेरचे जग पाहताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत दोघांचे निष्पाप चेहरे स्पष्ट दिसत आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिलेल्या खास आणि भावूक कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करत या क्यूट कपलावर आणि जुळ्या बाळांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रोहन गुजरची पोस्ट
“अभ्यासाचं जरा मला ठाऊक नाही
पण मी नेटाने तुम्हाला निसर्ग शिकवेन
बहरणं गळणं थांबणं शिकवेन
बघणं ऐकणं समजून घेणं शिकवेन
रंगांची भावना
भावनांचे कोन
चवीचा स्पर्श
स्पर्शाच गणित
आकार उकार हुंकार शिकवेन
माणसांची अथांग कोडी घालेन
उत्तराचा अद्भुत प्रश्न शिकवेन
पाणी आकाशातलं डोळ्यातलं शिकवेन
माणूस रंगापलीकडला भाषेपलीकडला शिकवेन
मी तुम्हाला प्रयत्न शिकवेन
पहिल्या क्रमांकाचं हरणं शिकवेन आणि
शेवटचा आनंद ही शिकवेन…”
हेही वाचा – रजनीकांतच्या ‘जेलर 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच वीकेंडला केली कोट्यवधींची कमाई!
‘नवी जन्मेन मी’ ते ‘मोरया’ चित्रपट; रोहन गुजरचा मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी प्रवास
अभिनेता रोहन गुजरने आजवर अनेक लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याची ‘होणार सून मी ह्या घरची’ व्यतिरिक्त ‘लव्ह लग्न लोचा’, ‘साथ दे तू मला’, ‘सांग तू आहेस का’, ‘बन मस्का’ आणि ‘नवी जन्मेन मी’ या मालिकांमधील भूमिका प्रचंड गाजल्या. याशिवाय तो ‘मोरया’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला होता. आता आयुष्याच्या या नव्या वळणावर आई-बाबा झालेल्या रोहन आणि स्नेहलवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.