तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप, मुलगा मल्हार पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांना मी…’

तनुश्री दत्ताने दिवंगत कलाकार नाना पाटेकर यांच्या निधनानंतर केलेल्या गंभीर आरोपांवर मल्हार पाटेकर यांनी नाव न घेता पहिली प्रतिक्रिया दिली.

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप, मुलगा मल्हार पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांना मी…’
tanushree dutta malhar patekar nana patekar

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर बहुतेक लोक शोक व्यक्त करत असताना अभिनेत्री तनुश्री दत्ताने मात्र त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्यामुळे ती चर्चेत आली. तनुश्रीने मीडियाशी बोलताना, तसंच स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही व्हिडीओ पोस्ट, स्टोरीतून त्यांच्यावर निशाणा साधला. अखेर आता नानांचा मुलगा मल्हार पाटेकरने यावर मौन सोडलं आहे. नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्यावर जिवंतपणी गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताने तिचे आरोप कायम ठेवले. तिने त्यांचा उल्लेख एव्हिल डेड, शैतान, अहंकारी असा केला. तसंच आपल्याला त्यांचं भाग्य लिहिण्याचा अधिकार देवाने दिला, असं सांगत आपण त्याला शिक्षा दिल्याचं ती तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाली होती. नानांबाबत असं नको नको ते बोलल्याने तनुश्री खूप ट्रोल झाली.

हेही वाचा : मामेबहिणीशी बोलण्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; आरोपी फरार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नानांच्या चाहत्यांनी तनुश्री दत्ताला सुनावलं आहेच. पण आता नाना पाटेकरांवर केलेल्या गंभीर आरोपांवर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर पहिल्यांदाच बोलला आहे. त्याने तिचं नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. मल्हार म्हणाला, “कुणाचंही नाव न घेता मला सांगायचं आहे की, लोक विनाकारण ज्या प्रकरणाचा उल्लेख करत आहेत, ते कधीच संपलं आहे. न्यायालयाकडून त्याबाबत स्पष्टता मिळाली आहे. केस संपली आहे, तरी बोलत आहेत.” “अशा लोकांना मी काहीच बोलणार नाही. जे सत्य आहे तेच राहणार, देव त्यांचं भलं करो. इतकंच मला त्यांना सांगायचं आहे.”, असं मल्हार हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number