तनुश्री दत्ताचे नानांवर गंभीर आरोप, मुलगा मल्हार पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांना मी…’

तनुश्री दत्ताने दिवंगत कलाकार नाना पाटेकर यांच्या निधनानंतर केलेल्या गंभीर आरोपांवर मल्हार पाटेकर यांनी नाव न घेता पहिली प्रतिक्रिया दिली.
tanushree dutta malhar patekar nana patekar
tanushree dutta malhar patekar nana patekar

गेल्या आठवड्यात मराठी, हिंदी सिनेसृष्टीत अजरामर भूमिका साकारलेले ज्येष्ठ कलावंत अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बहुतेक लोक शोक व्यक्त करत होते. मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताने निधनानंतरही त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्यामुळे ती चर्चेत आली. तनुश्रीने मीडियाशी बोलताना, तसंच स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही व्हिडीओ पोस्ट, स्टोरीतून त्यांच्यावर निशाणा साधला. तिने त्यांचा उल्लेख एव्हिल डेड, शैतान, अहंकारी असा केला. तसंच आपल्याला त्यांचं भाग्य लिहिण्याचा अधिकार देवाने दिला, असं सांगत आपण त्याला शिक्षा दिल्याचं ती तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाली होती. अखेर आता नानांचा मुलगा मल्हार पाटेकरने यावर मौन सोडलं आहे.

हेही वाचा : मामेबहिणीशी बोलण्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; आरोपी फरार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

आता नाना पाटेकरांवर केलेल्या गंभीर आरोपांवर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर पहिल्यांदाच बोलला आहे. त्याने तिचं नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. मल्हार म्हणाला, “कुणाचंही नाव न घेता मला सांगायचं आहे की, लोक विनाकारण ज्या प्रकरणाचा उल्लेख करत आहेत, ते कधीच संपलं आहे. न्यायालयाकडून त्याबाबत स्पष्टता मिळाली आहे. केस संपली आहे, तरी बोलत आहेत. अशा लोकांना मी काहीच बोलणार नाही. जे सत्य आहे तेच राहणार, देव त्यांचं भलं करो. इतकंच मला त्यांना सांगायचं आहे.”, असं मल्हारने म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version