हिंदी सिनेसृष्टीचे मेगास्टार, ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांचा आज, 11 ऑक्टोबर रोजी 84 वा वाढदिवस असून नेहमीप्रमाणे याहीवर्षी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 40 हून अधिक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमिताभ बच्चन यांना विविधी नावाने संबोधले जाते. बिग बी, शेहनशाह, महानायक, अँग्री यंग मॅन यांसारख्या अनेक नावांनी चाहते त्यांना ओळखतात. अमिताभ बच्चन यांचा जन्म जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथे झाला. तर त्यांचे शिक्षण नैनिताल (उत्तराखंड) येथील शेरवूड कॉलेज व दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या किरोरी मल कॉलेजमध्ये झाले. मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटात सूत्रधार (निवेदक) म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘आनंद’, ‘जंजीर’, ‘नमक हराम’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. पुढील काळात त्यांनी अधिक मोठे यश संपादन केले आणि हिंदी चित्रपटांमधील काही विशिष्ट भूमिकांमुळे त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळाली.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान, यशस्वी आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे बच्चन यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीवर असलेल्या त्यांच्या प्रचंड वर्चस्वामुळे फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस त्रुफो यांनी त्यांचे वर्णन ‘वन-मॅन इंडस्ट्री’ असे केले होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये सात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सतरा फिल्मफेअर पुरस्कार आणि एका दक्षिण फिल्मफेअर पुरस्काराचा समावेश आहे. 1970 च्या मध्यापासून ते 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांनी दीवार, शोले, कभी कभी, हेरा फेरी, अमर अकबर अँथनी, परवरिश, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, कसमे वादे, सुहाग, सुहाग, कायदा, कायदा यासारख्या अनेक सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. नमक हलाल, खुद-दार, कुली, अंधा कानून, शराबी आणि मर्द, मजबूर, चुपके चुपके, मिली, दो अंजाने, आलाप, द ग्रेट जुगार, शान, बरसात की एक रात, सिलसिला, कालिया, सत्ता पे सत्ता, बेमिसाल, शक्ती, आखरी रास्ता आणि शहेनशाह या चित्रपटांचा समावेश आहे.