मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्याला 2013 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1 जानेवारी 1951 मध्ये जन्माला आलेल्या नाना पाटेकरांनी रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत तसेच नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका चोख पार पाडत नानांनी आपला ठसा उमटवला.
हेही वाचा- मोठी बातमी! सिनेसृष्टीतील नटसम्राट यांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास
नाना पाटेकरांनी सुरुवातीच्या काळात मराठी नाटकांमध्ये काम केलं. ‘पुरुष’ मध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकात साकारलेला सत्तार अजरामत केला. त्यानंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीत झळकायला लागले. 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीला सुरुवात केली. त्यानंतर ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ ‘आज की आवाज’ या सिनेमांतही नानांनी काम केलं होतं. त्यानंतर ‘अंकुश’ या चित्रपटातील बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका ही नानाची पहिली यशस्वी भूमिका होती. त्यानंतर सुजाता मेहता सिनेमाची नायिका होती.
1988 मधील ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र 1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. यात नानांची खलनायकाची भूमिका होती. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1992 मध्ये ‘तिरंगा’ सिनेमाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. ‘तिरंगा’मधले डायलॉग्ज खूप गाजले आणि नाना पाटेकर घराघरांत पोहोचले. हिंदीसोबतच मराठीमध्ये देऊळ, नटसम्राट, पक पक पकाक, डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील कामे चांगलीच स्मरणात राहिली. नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीतर, सामाजिक भान जपणारे आणि असणारे अभिनेते होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.