मोठी बातमी! सिनेसृष्टीतील नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास .

मोठी बातमी! सिनेसृष्टीतील नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar passes away

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यामुळे त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर नाना पाटेकर यांना पहाटे 5:20 वाजता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेला दिली.

हेही वाचा- मिथुन चक्रवर्ती यांना पश्चिम बंगालमध्ये मोठी जबाबदारी; राज्य सरकारच्या माहिती व सांस्कृतिक विभागात सल्लागारपदी निवड

त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.
दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशी नाना पाटेकरांची ओळख होती.

नाना पाटेकर यांना 2013 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर हे मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारे दमदार कलाकार होते. नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number