Salman Khan: पाकिस्तान सरकारने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानविरोधात खळबळजनक निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील एका कार्यक्रमादरम्यान सलमानने बलुचिस्तानचा वेगळा देश म्हणून उल्लेख केला. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकारने दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत सलमान खानला 'दहशतवादी' म्हणून घोषित करत त्याचे नाव 'चौथ्या अनुसूची' (Fourth Schedule) यादीत समाविष्ट केले आहे.
पाकिस्तानची 'चौथी अनुसूची' म्हणजे काय?
ही यादी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्यानुसार तयार केलेली आहे. दहशतवादी किंवा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची नावे यात असतात. या यादीतील व्यक्तींवर काही कठोर निर्बंध लादले जातात. यात देशांतर्गत प्रवासावर बंदी, मालमत्ता जप्ती, कडक देखरेख आणि चौकशी याचा समावेश होतो. हे सर्व कायदे फक्त पाकिस्तानच्या सीमेत लागू होतात.
हेही वाचा - Satish Shah Marathi Film Journey: ‘गंमत जंमत’ ते ‘वाजवा रे वाजवा’…सतीश शाह यांनी मराठी चित्रपटातही उमटवला ठसा
पाकिस्तान पोलीस सलमान खानला अटक करू शकतात का?
या घोषणेनंतर, सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की पाकिस्तान पोलीस भारतीय हद्दीत सलमान खानवर काही कारवाई करू शकतात का? यावर कायदेशीरदृष्ट्या स्पष्ट उत्तर नाही असं आहे. पाकिस्तानच्या कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतीय भूमीत कोणतेही अधिकार नाहीत. जर पाकिस्तानने कारवाई करायची ठरवली, तर त्याला भारताचे सहकार्य घेण्यासाठी प्रत्यार्पण करार (Extradition Treaty) किंवा MLAT (Mutual Legal Assistance Treaty) ची गरज भासेल. परंतु भारत-पाकिस्तान दरम्यान असा कोणताही करार अस्तित्वात नाही, त्यामुळे अटक किंवा कारवाई शक्य नाही.
हेही वाचा - Sumeet Raghavan Emotional Post : सुमीत राघवनने सांगितली 'साराभाई वर्सेस साराभाई'ची ही आठवण; म्हणाले, 'मोठा मुलगा या नात्याने....'
आंतरराष्ट्रीय कायदा काय आहे?
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, सीमापार अटक फक्त “इंटरपोल रेड नोटीस” किंवा तत्सम जागतिक कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते. तथापि, अशा कारवाईसाठी गंभीर गुन्ह्यांचे ठोस पुरावे आवश्यक असतात. सलमान खानविरुद्ध पाकिस्तानने केलेली घोषणा फक्त एका विधानावर आधारित असून, त्यात कोणतीही गुन्हेगारी कृती दाखवलेली नाही. त्यामुळे या निर्णयाची आंतरराष्ट्रीय वैधता अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे पाकिस्तानने सलमान खानला 'दहशतवादी' घोषित केले असले तरी, हा निर्णय फक्त त्यांच्या देशात लागू आहे. भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर या घोषणेचा कायदेशीर परिणाम होणार नाही.