‘शेवटचं गुडबायही करता आलं नाही’, रोहन गुजर आणि केतकी पालव यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘आमने सामने’ नाटकाच्या टीममधून असं बाहेर काढलं की..

मराठी रंगभूमीवर सातत्याने सुरू असणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Rohan Ketaki
Rohan Ketaki

Rohan Gujar, Ketaki Palav Aamne-Saamne Marathi Play Controversy: मराठी रंगभूमीवर सातत्याने सुरू असणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या नाटकामध्ये लीना भागवत, मंगेश कदम, अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, आता रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक नाटकातून काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि शेवटचा प्रयोग एन्जॉय करता न आल्याची खंत बोलून दाखवली आहे.

गेली 7 ते 8 वर्षे या नाटकामध्ये..
रोहन गुजर यांनी सांगितले की, ते गेली 7 ते 8 वर्षे या नाटकामध्ये काम करत होते आणि त्यांचे तब्बल 670 प्रयोग झाले आहेत. तर केतकी पालव म्हणाल्या की, त्या साडेतीन वर्षांपासून हे नाटक करत आहेत आणि त्यांनीदेखील 520 प्रयोग पूर्ण केले आहेत. तरीही, त्यांना योग्य पद्धतीने ‘गुडबाय’ म्हणण्याची संधी मिळाली नाही, अशी त्यांची मोठी तक्रार आहे. रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या नाटकाच्या प्रयोगानंतर एका मीटिंगमध्ये त्यांना सांगण्यात आले की, हा त्यांचा शेवटचा प्रयोग होता, असे त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले.

हेही वाचा – आणखी एका बापलेकाची जोडी रुपेरी पडद्यावर; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे

शेवटचं गुडबायसुद्धा म्हणता आलं नाही..

नाटकातून बाहेर काढण्यापेक्षाही त्यांना शेवटचं गुडबायसुद्धा म्हणता आलं नाही आणि शेवटचा प्रयोग मनापासून एन्जॉय करता आला नाही, याचे जास्त दुःख आहे, असे त्यांनी सांगितले. पैसे आणि मानधन वाढवून मागितल्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना नाटकातून काढून टाकण्यात आलं, असा त्यांचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, कोविडच्या काळात नाटक दोनदा बंद झाले असताना, त्यांनी अर्धं मानधन घेऊन प्रयोग चालू ठेवण्यासाठी मदत केली होती. आता या नाटकात दिसणार नसल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

मराठी कलाकारांच्या कमेंटस्
रोहन आणि केतकी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत केतकी आणि रोहन यांना अशा पद्धतीने बाहेर काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणाली, ‘एक अभिनेत्री म्हणून मी या भावना समजू शकते. रिप्लेसमेंटचं दुःख काय असतं, ते मला माहीत आहे.’ तर अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, ‘खरं कारण मला माहीत आहे. मलाही राग आला होता.’ अशा कमेंट्स करत इतर कलाकारांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे, ज्यामुळे या विवादाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – मराठी मिडीयम मालिकेच्या कास्टिंगवरून ट्रोलिंग; चिन्मय मांडलेकरांचे सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाले?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version