Satish Shah's Last Message: बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि सर्वांच्या आवडते अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे आणि साध्या स्वभावामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. सतीश शाह हे अखेरच्या क्षणीदेखील आपल्या मित्रांशी संपर्कात होते. यातील एक नाव म्हणजे सचिन पिळगावकर.
मृत्यूपूर्वी अवघ्या दोन तास आधी, सतीश शाह यांनी सचिन पिळगावकरांना एक हलकाफुलका मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'Because of my age, people often think I am mature.' हा मेसेज पाठवण्याची वेळ होती दुपारी 12:56 आणि त्यानंतर काही तासांतच सतीश शाह यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आली.
हेही वाचा - मन हेलावणारी घटना! चित्रपट प्रदर्शनाच्या अगदी तोंडावर मराठी अभिनेत्यानं स्वतःला संपवलं; सचिन चांदवडेच्या जाण्यानं हळहळ
सोशल मीडियावर ही गोष्ट समोर येताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. काहींनी या घटनेला “योगायोग” म्हटलं, तर काहींनी “प्रत्येकाला शेवटच्या क्षणी सचिन पिळगावकरांनाच का आठवतातं?” असे ट्रोलिंग कमेंट्स आणि मीम्स शेअर केले. पण या सर्वांवर सचिन पिळगावकरांनी स्वतः शांतपणे उत्तर दिलं. त्यांनी फेसबुकवर सतीश शाह यांचा शेवटचा मेसेज शेअर करत लिहिलं, 'माझा मित्र सतीश शाह यांनी काल दुपारी 12.56 वाजता पाठवलेला शेवटचा मेसेज होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.' या पोस्टनंतर सोशल मीडियावर वातावरण बदललं आणि पिळगावकरांचं ट्रोलिंग थांबलं. चाहत्यांनी सतीश शाह यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे रस्ता अपघातात निधन; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
याशिवाय, एका मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, 'सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती. यावेळी सतीशनं गाणं लावलं आणि त्यावर तिघांनी डान्स केला होता. तो पूर्णपणे ठीक होता, त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी ऐकून मी हादरलो.' सतीश शाह यांच्या अचानक जाण्यानं केवळ बॉलिवूडच नाही तर लाखो चाहत्यांचं मन हेलावलं आहे.