Monday, November 17, 2025 06:32:54 AM

Maharashtra Flood Relief: सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार! सखाराम बाइंडर’ नाटकातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

अभिनेते सयाजी शिंदेंनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी नाटकाच्या पुढील दहा प्रयोगांसाठी केवळ एक रुपया मानधन घेण्याची घोषणा केली.

maharashtra flood relief सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार सखाराम बाइंडर’ नाटकातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

Maharashtra Flood Relief: नाटक ही केवळ कला नाही, तर समाजाचे प्रतिबिंब देखील असते. याच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी प्रसिद्ध नाटक ‘सखाराम बाइंडर’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात दिला आहे. सुमुख चित्र निर्मित नाटकाचा दिल्लीतील शुभारंभ नुकताच हाऊसफुल्ल पार पडला. या प्रयोगाला भक्कम कलाकारांची जोड मिळाली आहे. या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे, नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे आणि अभिजीत झुंजारराव या कलाकारांनी नाटकातील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले असून, संगीताची जबाबदारी आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांनी सांभाळली आहे.

कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी सांगितले की, दिल्लीतील प्रयोगातून मिळणारे सर्व उत्पन्न महाराष्ट्रातील पूरग्रस्त लोकांसाठी दिले जाईल. यासोबतच, अभिनेते सयाजी शिंदेंनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी नाटकाच्या पुढील दहा प्रयोगांसाठी केवळ एक रुपया मानधन घेण्याची घोषणा केली असून, उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही पूरग्रस्तांना दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे. 

हेही वाचा - 'गारवा'फेम मिलिंद इंगळे 'मुखातिब'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला

सयाजी शिंदे म्हणाले, 'मी आयुष्यात परत नाटक करेन असं मला वाटलं नव्हतं. हे नाटक अत्यंत जिवंत आणि सुंदर आहे. महाराष्ट्रात पुरामुळे बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या नाटकातून होणारा नफा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. पुढील दहा प्रयोगांचा मानधन मी घेणार नाही. ते पूरग्रस्तांसाठी दिले जाईल.' 

हेही वाचा - Gautami Patil: तू गरीब जनतेलाही त्रास द्यायचा ठेका घेतला आहेस का? अभिनेता पवन चौरेचा गौतमी पाटीलला सवाल

दरम्यान, सयाजी शिंदेंचा हा निर्णय, कला आणि माणुसकीच्या संगमाचा अनोखा अनुभव देतो. या प्रयोगांना उपस्थित राहून कलाकार आणि निर्मात्यांनी घेतलेला सामाजिक जबाबदारीचा संदेश अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, जे निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.


सम्बन्धित सामग्री