October 2025 Bank Holidays: सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतचे अनेक सण या वर्षी ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याने बँकांना मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या असतील. जर तुम्ही पुढच्या महिन्यात बँकिंगसंबंधी कामे करण्याचा विचार करत असाल, तर आधी आरबीआयने प्रसिद्ध केलेले सुट्टीचे कॅलेंडर नक्की तपासा.
अर्ध्याहून अधिक दिवस बँका बंद
आरबीआयच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका एकूण 21 दिवस बंद राहतील. यात गांधी जयंतीची राष्ट्रीय सुट्टी, दिवाळी आणि विविध राज्यांमधील प्रादेशिक सणांचा समावेश आहे.
हेही वाचा - Gold Price Today: सोन्याचे भाव दसऱ्यापूर्वीच गगनाला भिडले; 10 ग्रॅम सोन्याची किंमत पाहून थक्क व्हाल
सुट्ट्यांची सविस्तर यादी
1 ऑक्टोबर – विजयादशमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा (दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू)
2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती (राष्ट्रीय सुट्टी)
3 ते 4 ऑक्टोबर – दसरा, दुर्गा पूजा (आसाम, बिहार, झारखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल)
6 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा (ओडिशा, पश्चिम बंगाल)
7 ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी जयंती, कुमार पौर्णिमा (दिल्ली, पंजाब, ओडिशा)
10 ऑक्टोबर – करवा चौथ (दिल्ली, पंजाब, हरियाणा)
11, 12, 19, 25, 26 ऑक्टोबर – शनिवार व रविवारची साप्ताहिक सुट्टी
18 ऑक्टोबर – कटी बिहू (आसाम)
20 ते 23 ऑक्टोबर – दिवाळी, नरक चतुर्दशी, गोवर्धन पूजा, बळी प्रतिपदा, भाई दूज (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर इ.)
27, 28 ऑक्टोबर – छठ पूजा (बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश)
31 ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)
हेही वाचा - Paytm Festive Season Offer: Paytm ची धमाकेदार ऑफर! आता प्रत्येक पेमेंटवर मिळणार सोन्याचं खास बक्षीस; जाणून घ्या
ग्राहकांना पर्यायी सुविधा उपलब्ध
ऑक्टोबरमध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार असल्या तरी ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. एटीएमद्वारे रोख रक्कम काढणे व ठेवणे, चेक डिपॉझिट मशीन तसेच नेटबँकिंगसारख्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.