Paytm Festive Season Offer: सणासुदीचा हंगाम सुरू होताच बाजारपेठेत ऑफर्सची रेलचेल सुरू झाली आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Paytm नेदेखील आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर लाँच केली आहे. ही ऑफर फक्त आकर्षकच नाही तर प्रत्येक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.
काय आहे पेटीएमची ऑफर?
पेटीएमने जाहीर केलेल्या नव्या योजनेनुसार, ग्राहकांना प्रत्येक पेमेंटवर सोन्याचे नाणे (Gold Coin) मिळणार आहे. ही नाणी थेट त्यांच्या पेटीएम खात्यात जमा होतील आणि नंतर त्यांचे डिजिटल सोन्यात रूपांतर करता येईल.
हेही वाचा:Small Saving Schemes: PPF, SSY, NSC सह लघु बचत योजनांवर किती व्याज मिळेल? 30 सप्टेंबरला जाहीर होणार नवीन व्याजदर
-
प्रत्येक व्यवहाराच्या 1% किमतीइतकी सोन्याची नाणी ग्राहकांना बक्षीस स्वरूपात मिळतील.
-
100 सोन्याच्या नाण्यांचे मूल्य = 1 रुपया इतके ठरवले गेले आहे.
-
हे मूल्य नंतर डिजिटल गोल्ड मध्ये ट्रान्सफर करता येईल.
कोणत्या पेमेंट्सवर मिळतील नाणी?
ही ऑफर पेटीएमच्या जवळपास सर्व सेवांवर लागू आहे.
याशिवाय, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे केलेल्या सर्व व्यवहारांनाही ही ऑफर लागू आहे. सर्वात खास बाब म्हणजे, जर ग्राहकांनी RuPay क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट केले तर त्यांना दुप्पट सोन्याची नाणी मिळणार आहेत.
हेही वाचा: RBI News : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय; मृत खातेदारांच्या दाव्यांचे निवारण 15 दिवसांत होणार
पेटीएमचं ध्येय काय?
फिनटेक क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना पेटीएम पुन्हा एकदा UPI मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे.
-
2024 मध्ये पेटीएमचा बाजार हिस्सा 13% होता, पण पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंधांमुळे तो घटून 7% वर आला.
-
ऑगस्ट 2025 मध्ये पेटीएमने तब्बल 1.4 अब्ज UPI व्यवहार नोंदवले, जे मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 1 अब्ज जास्त होते.
-
कंपनीने जून 2025 च्या तिमाहीत ₹123 कोटींचा नफा कमावला, तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ₹840 कोटींचा तोटा झाला होता.
यावरून स्पष्ट होते की, पेटीएम या ऑफरद्वारे ग्राहकांमध्ये आपला विश्वास वाढवण्याबरोबरच UPI व्यवहारांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व मिळवू इच्छित आहे.
ग्राहकांसाठी फायदेशीर का?
सणासुदीच्या काळात लोकांकडून सर्वाधिक ऑनलाईन पेमेंट्स होतात. अशा वेळी प्रत्येक व्यवहारावर सोन्याचे नाणे मिळणे ही गोष्ट ग्राहकांसाठी अतिरिक्त बचतीची संधी आहे. हे नाणे नंतर डिजिटल सोन्यात रूपांतरित करता येते, ज्यामुळे ते गुंतवणुकीचा एक पर्याय ठरते.