Sunday, November 16, 2025 08:52:39 AM

Punha Shivajiraje Bhosale Movie Teaser : डोळ्यात अंगार, मराठी बाणा आणि करारीपणा ; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

'स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!' या घोषणेने महाराष्ट्राच्या सिनेरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

punha shivajiraje bhosale movie teaser  डोळ्यात अंगार मराठी बाणा आणि करारीपणा   पुन्हा शिवाजीराजे भोसलेचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: 'स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!' या घोषणेने महाराष्ट्राच्या सिनेरसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि लिखित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच, या चित्रपटाचा टीझर एका दिमाखदार सोहळ्यात सादर करण्यात आला असून, आजवर न पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप आणि मराठी बाणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. या चित्रपटात मराठी अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्या, मुंबईतील मराठी माणसांची स्थिती आणि परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे.

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत आहे. सिद्धार्थसह, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री, तसेच, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा महेश मांजरेकरांनी लिहिली असून चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. 

हेही वाचा: Dimple Hayathi: 'कुत्र्यासारखं वागवलं आणि...', 'या' अभिनेत्रीवर मोलकरणीचे गंभीर आरोप

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाबाबत दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, 'हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर जनमानस जागृत केले. त्याच विचारांचा प्रकाश आजच्या पिढीसमोर आणायचा आहे'.

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, 'हा चित्रपट महाराष्ट्राच्या इतिहासाशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज केवळ दिसणार नाहीत, तर बोलणारही आहेत'. तर चित्रपटात महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेते सिद्धार्थ बोडके म्हणाला की, 'छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. या चित्रपटात दाखवलेले महाराज संतप्त आहेत, कारण आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहून कोणाच्याही मनात राग निर्माण होईल'.


सम्बन्धित सामग्री