नवी दिल्ली: तंत्रज्ञानाच्या दुनियेत नवनवीन प्रयोग करण्यात आघाडीवर असलेल्या सोनी (Sony) कंपनीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गाणी ऐकताना आजूबाजूच्या जगाचा विसर पडणे आता जुने झाले, कारण सोनीने आपले अत्याधुनिक LinkBuds Clip हे ओपन-इयर, क्लिप-स्टाईल इअरबड्स लाँच केले आहेत. सध्या उत्तर अमेरिकन बाजारपेठेत दाखल झालेल्या या बड्सचे वैशिष्ट्य म्हणजे, हे तुमच्या कानाचे पडदे बंद न करता तुम्हाला संगीताचा आनंद घेवू शकाल. आवाजाच्या दुनियेत राहूनही वास्तवाशी नाळ जोडलेली ठेवण्याची संकल्पना या इअरबड्समधून साकार झाली आहे.
या इअरबड्सची रचना ही C-shape क्लिपसारखी असून ती कानाच्या बाहेरच्या बाजूला अतिशय सुरक्षितपणे बसते. तासनतास इअरफोन्स वापरल्याने होणारा कानांचा थकवा आणि वेदना टाळण्यासाठी हे डिझाइन खास तयार करण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेले रिमूव्हेबल फिटिंग कुशन्स धावताना किंवा व्यायाम करताना अतिरिक्त स्थिरता देतात. विशेष म्हणजे, ओपन-इयर डिझाइनमुळे रहदारीचा आवाज किंवा आजूबाजूच्या सूचना ऐकू येतात, ज्यामुळे सुरक्षितता आणि मनोरंजन यांचा समतोल साधला जातो.
ध्वनी गुणवत्तेच्या बाबतीत सोनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. यामध्ये 10 mm ड्रायव्हर्स आणि सोनीचे प्रसिद्ध DSEE (Digital Sound Enhancement Engine) तंत्रज्ञान देण्यात आले आहे. वापरकर्ते Sony Sound Connect अॅपच्या मदतीने 10-band equalizer वापरून आपल्या आवडीनुसार साउंड ट्यून करू शकतात. तसेच 360 Reality Audio आणि बॅकग्राउंड म्युझिक इफेक्ट्समुळे गाणी ऐकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होतो. व्हॉईस बूस्ट आणि साउंड लीकॅज रिडक्शनसह एकूण 3 साउंड मोड्स उपलब्ध आहेत.
हेही वाचा: "बिहारच्या मंत्र्यांनी आधी स्वतःचे राज्य सुधारावे" बिहार भवनावरून मनसेचा कडाडून विरोध, अविनाश अभ्यंकरांचा हल्लाबोल
कॉलिंगसाठी यामध्ये Bone Conduction Sensor आणि AI-based noise reduction तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किंवा वाऱ्याच्या आवाजातही कॉल्स स्पष्ट राहतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.3 असून Multipoint Connection द्वारे एकाच वेळी दोन डिव्हाइसशी हे बड्स कनेक्ट करता येतात. घाम किंवा पावसापासून संरक्षणासाठी याला IPX4 rating देण्यात आली आहे, जी फिटनेस युजर्ससाठी उपयुक्त ठरते.
बॅटरीच्या बाबतीत LinkBuds Clip प्रभावी ठरतात. एकदा चार्ज केल्यावर इअरबड्स नऊ तास चालतात, तर चार्जिंग केससह एकूण 37 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. फक्त तीन मिनिटांच्या क्विक चार्जवर तब्बल एक तास म्युझिक प्लेबॅक मिळतो. प्रत्येक इअरबडचे वजन फक्त 6.4 ग्रॅम असून हे बड्स Black, Grey, Green आणि Lavender रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, अमेरिकेत या इअरबड्सची किंमत 229.99 डॉलर (सुमारे 21,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. प्रीमियम डिझाइन, वेगळा फॉर्म फॅक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधणाऱ्या ऑडिओ प्रेमींसाठी हे इअरबड्स एक आकर्षक पर्याय ठरणार आहेत. भारतात हे LinkBuds Clip कधी उपलब्ध होणार, याकडे आता सर्व टेकप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Parle G Factory Demolished: मुंबईत प्रवास करताना रेल्वेच्या खिडकीतून येणारा तो पार्लेजी बिस्किटांचा वास आता विरणार; पार्ले बिस्किट कारखान्याचा कायापालट