MPs and MLAs Party Switching: 111 खासदार अन् आमदारांनी बदलले पक्ष; ADR अहवालात मोठा खुलासा, ‘हे’ राज्य देशात अव्वल

या अहवालातील विश्लेषणानुसार, 2022 ते 2026 या कालावधीत संसद आणि विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय निष्ठा बदलली.

MPs and MLAs Party Switching: 111 खासदार अन् आमदारांनी बदलले पक्ष; ADR अहवालात मोठा खुलासा, ‘हे’ राज्य देशात अव्वल
111 खासदार अन् आमदारांचे पक्षांतर

MPs and MLAs Party Switching: ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’च्या नवीन अहवालानुसार, 2022 पासून देशातील तब्बल 111 खासदार आणि आमदारांनी आपले पक्ष बदलल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालातील विश्लेषणानुसार, 2022 ते 2026 या कालावधीत संसद आणि विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय निष्ठा बदलली. पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमध्ये नागालँड आणि पश्चिम बंगालमधील नेत्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पक्ष बदलणाऱ्यांमध्ये 33 खासदार आणि 78 आमदारांचा समावेश

या सर्वसमावेशक अहवालात या कालावधीत पार पडलेल्या विविध निवडणुका आणि पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, 2022 पासून लोकसभेचे 26 सदस्य, राज्यसभेचे 7 सदस्य आणि 78 आमदारांनी आपले पक्ष बदलले आहेत. ADR च्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, यामध्ये केवळ पक्ष बदलणे नव्हे तर पक्षांचे विलीनीकरण, राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीतील विजय आणि अपात्र ठरल्यानंतर पोटनिवडणुकीतील विजय अशा विविध राजकीय घटनांचा समावेश आहे.

नागालँडमध्ये सर्वाधिक 32 आमदार एनपीएफमध्ये सामील

या संपूर्ण यादीत नागालँडमध्ये अशा सर्वाधिक (एकूण 32) घटना नोंदवल्या गेल्या असून त्या सर्व आमदारांशी संबंधित आहेत. यातील बहुतांश घटना सत्ताधारी ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ (NDPP) आणि ‘नागा पिपल्स फ्रंट’ (NPF) यांच्यातील युती व राजकीय समीकरणांशी जोडलेल्या आहेत. ADR च्या विश्लेषणानुसार, NPF ला यामध्ये सर्वाधिक आमदार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मूळचे NDPP च्या तिकिटावर निवडून आलेले 25 आमदार पक्ष बदलणाऱ्यांमध्ये समाविष्ट होते, तर एकूण 32 आमदार NPF मध्ये सामील झाले.

हेही वाचा – Student Elections: महाराष्ट्रात 33 वर्षांनंतर विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होण्याच्या हालचालींना वेग; उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून समिती स्थापन

पश्चिम बंगालमध्ये 20 TMC खासदार NCPI मध्ये सामील आणि इतर घडामोडी

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये अशा 20 घटनांची नोंद झाली असून त्या सर्व खासदारांशी संबंधित आहेत. विश्लेषणानुसार, हे सर्व 20 खासदार मूळतः ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’च्या तिकिटावर संसदेत पोहोचले होते आणि त्यानंतर ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये सामील झाले. या खासदारांनी पक्षात विलीनीकरण झाल्याचा दावा केला असला, तरी हे प्रकरण सध्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रलंबित आहे. याशिवाय, मेघालयातील युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) च्या 8 आमदारांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number