Wednesday, July 09, 2025 10:02:15 PM

अहमदाबाद विमान अपघात स्थळावर सापडले 70 तोळे सोने आणि 'या' वस्तू !

एका वृत्तसंस्थेशी बोलताना अहमदाबादचे व्यापारी राजेश पटेल यांनी म्हटलं की, बचाव कार्यादरम्यान आम्हाला ढिगाऱ्यातून सुमारे 70 तोळे सोने आणि सुमारे 70 हजार रुपये रोख सापडले.

अहमदाबाद विमान अपघात स्थळावर सापडले 70 तोळे सोने आणि या वस्तू
Ahmedabad plane Crash
Edited Image

अहमदाबाद: अहमदाबादमधील विमान अपघातात हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस होता. या अपघातात एक प्रवासी सोडला तर सर्वांचा मृत्यू झाला होता. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त मृतांमध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज नागरिकांचाही समावेश होता. हे विमान बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या छतावर कोसळले. त्यानंतर विद्रूप मृतदेह आणि कचरा सर्वत्र पसरलेला होता. सध्या भारत, अमेरिका आणि ब्रिटनच्या एजन्सी विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत. दरम्यान, एका व्यावसायिकाने दावा केला आहे की, त्याला ढिगाऱ्यातून सुमारे 70 तोळे सोने सापडले.

बचाव कार्यादरम्यान सापडले 70 तोळे सोने -   

एका वृत्तसंस्थेशी बोलताना अहमदाबादचे व्यापारी राजेश पटेल यांनी म्हटलं की, बचाव कार्यादरम्यान आम्हाला ढिगाऱ्यातून सुमारे 70 तोळे सोने आणि सुमारे 70 हजार रुपये रोख सापडले. हे सर्व आम्ही सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केले. या सोन्याची किंमत सुमारे 83 लाख रुपये असू शकते. माझ्या घरापासून 300 मीटर अंतरावर विमान अपघात झाला. आमच्या घराजवळ एक डॉक्टरांची रुग्णवाहिका होती. ज्याच्या मदतीने आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सगळीकडे आग आणि अंधार होता. काहीही दिसत नव्हते. ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की आमचे डोळे जळत होते. धुरामुळे आत जाण्यासाठी जागा नव्हती.

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय! आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात

आग कमी झाल्यानंतर आम्हाला सर्वत्र लोकांचे मृतदेह पडलेले दिसले. आम्ही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून आम्ही त्यांना रुग्णालयात नेऊ शकू. संपूर्ण विमानाचे अवशेष आणि मृतदेह ढिगाऱ्यात पडलेले होते. आम्ही तिथे मृतदेह गोळा करण्यास मदत केली, असंही राजेश पटेल यांनी सांगितलं. 

हेही वाचा - अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स झाला खराब! डेटा विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार

विमान अपघात स्थळी सापडल्या 'या' वस्तू - 

अहमदाबाद विमान अपघातस्थळी 70 ते 80 तोळे सोने, जळालेले मोबाईल, ब्रिटिश, भारतीय पासपोर्ट, लॅपटॉप आणि आयपॅड आढळले. तसेच अपघातस्थळी गीता आणि भगवान कृष्णाच्या मूर्तीही सापडल्या. या सर्व वस्तू सरकारकडे जमा करण्यात आल्या आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री