Sunday, August 17, 2025 01:43:07 PM

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय! आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात

एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 20 जून ते 15 जुलै पर्यंत सुरू राहील.

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात
Air India
Edited Image

Air India Cuts International Flights: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात घोषित केली आहे. अलिकडेच उड्डाणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 20 जून ते 15 जुलै पर्यंत सुरू राहील. या काळात एअर इंडियाकडे राखीव विमान व्यवस्था असेल. ज्याचा वापर कोणत्याही अनपेक्षित व्यत्ययाच्या बाबतीत केला जाईल.

हेही वाचा - एअर इंडिया, इंडिगोनंतर आता स्पाइसजेटच्या विमानातही तांत्रिक बिघाड

दरम्यान, एअर इंडियाने म्हटलं आहे की, वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा कमी करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या अनेक प्रवाशांना त्रास झाला आहे. आम्ही याबद्दल सर्व प्रवाशांची माफी मागतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करत असून येणाऱ्या काळात एअर इंडिया पुन्हा एकदा आपल्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सुरक्षित प्रवास देऊ शकेल.

हेही वाचा - अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स झाला खराब! डेटा विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार

अहमदाबाद विमान अपघात

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 12 जून रोजी 35 सेकंदातचं बोईंग एआय-171 विमान कोसळले. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. तर एका तरुणाचा जीव वाचला. याशिवाय ज्या वसतिगृहावर विमान कोसळले, त्या वसतिगृहात उपस्थित असलेल्या सुमारे 29 जणांचा मृत्यू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे देखील या विमान अपघातात निधन झाले.
 


सम्बन्धित सामग्री