SpiceJet Flight Suffers Technical Fault: हैदराबादहून तिरुपतीला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाला तांत्रिक अडचणींमुळे परतावे लागले. हैदराबाद-तिरुपती स्पाइसजेट एसजी 2696 हे विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे या विमानाला परतावे लागले. विमान आरजीआय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यापूर्वी, इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला होता. इंडिगोचे विमान दिल्लीहून लेहला जात होते, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर पुन्हा उतरवण्यात आले.
स्पाइसजेट जारी केलं निवेदन -
दरम्यान, स्पाइसजेटने सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंग केले नाही. विमानाच्या दारातील दिवा अधूनमधून लुकलुकत होता. अशा परिस्थितीत, वैमानिकाने खबरदारी म्हणून हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि त्यांना तिरुपतीला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स झाला खराब! डेटा विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार
कंपनीने पुढे म्हटलं आहे की, '19 जून 2025 रोजी, हैदराबाद-तिरुपती उड्डाण करणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाच्या टेकऑफनंतर AFT बॅगेज डोअर लाइट अधूनमधून सुरू होत होता. केबिन प्रेशर संपूर्ण वेळ सामान्य राहिला. खबरदारी म्हणून, वैमानिकांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सामान्य पद्धतीने उतरवण्यात आले.'
हेही वाचा - इंडिगो फ्लाइटमध्ये अडकले भूपेश बघेल! 30 मिनिटे दरवाजा न उघडल्याने उडाला गोंधळ
इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड -
दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमान 6E 2006 तांत्रिक कारणांमुळे दिल्लीला परतावे लागले. उड्डाणानंतर विमानात काही तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर, ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह 180 लोक होते. इंडिगोचे विमान 6E 2006 सकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान लेहमधील कुशोक बाकुला रिम्पोची विमानतळावर उतरणार होते. परंतु लेहला पोहोचण्यापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर पायलटने सुरक्षेच्या कारणास्तव विमान परत दिल्लीला आणण्याचा निर्णय घेतला.