अभिजीत दीपकेंच्या ‘तिरंगा मार्च’च्या पार्श्वभूमीवर कोर्टाचा मोठा निर्णय; पोलीस अ‍ॅक्शनसाठी सज्ज, उद्या काय होणार?

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन साम्ब्रे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत पालिका बाजारातील पादचारी आणि स्थानिक विक्रेत्यांनी रॅलीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
अभिजीत दीपकेंच्या ‘तिरंगा मार्च’च्या पार्श्वभूमीवर कोर्टाचा मोठा निर्णय; पोलीस अ‍ॅक्शनसाठी सज्ज, उद्या काय होणार?
HC On Abhijeet Dipke Tiranga March

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते अभिजीत दीपके यांनी आयोजित केलेल्या बहुचर्चित ‘तिरंगा मार्च’च्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन साम्ब्रे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत पालिका बाजारातील पादचारी आणि स्थानिक विक्रेत्यांनी रॅलीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणी तिरंगा मार्चला स्थगिती देण्यास साफ नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना आणि दिल्ली पोलिसांना मोठा झटका बसला असून, दुसरीकडे अभिजीत दीपके आणि त्यांच्या पक्षाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलणार’; पोलिसांची न्यायालयात भूमिका

न्यायालयाने मार्चला थेट प्रतिबंध घातला नसला, तरी सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्यावतीने बाजू मांडताना एसीजी चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले की, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे कटिबद्ध आहेत. रॅलीच्या नावाखाली कोणतीही अनुचित प्रकार किंवा नियमभंग झाल्यास आयोजकांच्या आणि संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी न्यायालयात दिला. या भूमिकेमुळे उद्या आयोजित होणाऱ्या या तिरंगा मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, कॅनॉट प्लेस आणि लगतच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा –  अभिजीत दीपकेंच्या पत्रकार परिषदेत जोरदार गदारोळ; कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात पुन्हा आंदोलनाची हाक

‘तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही, प्रसंगी तुरुंगवास स्वीकारण्यास तयार’

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आशुतोष आणि सौरभ दास यांना केवळ तिरंगा फडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. “तिरंगा फडकावणे हा कधीही गुन्हा असू शकत नाही आणि आमच्यासाठी देशाच्या राष्ट्रध्वजापेक्षा कोणीही मोठे नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. जे नागरिक दिल्लीत येऊ शकणार नाहीत, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा रॅली काढावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, या आंदोलनानंतर प्रशासनाकडून आपल्यालाही तुरुंगात टाकले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत देशाचा तिरंगा हाच आपला सर्वोच्च स्वाभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या राजकीय संघर्षांमुळे दिल्लीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version