Air India चा मोठा झटका! विमानसेवा बंद राहणार, प्रवाशांना मिळणार कोणते पर्याय?

Air India : विमानाने प्रवास करण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम कोणत्या प्रवाशांवर होणार आणि तिकीट बुक केलेल्यांसाठी काय पर्याय आहेत? जाणून घ्या सविस्तर.

Air India चा मोठा झटका! विमानसेवा बंद राहणार, प्रवाशांना मिळणार कोणते पर्याय?
Air India Flight Cancellation

विमानाने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. एअर इंडियाने काही विमानसेवा या तात्पुरत्या स्थतिग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा नेमकी कोणत्या देशासाठी बंद करण्यात आलेली आहे आणि हा निर्णय किती दिवसांसाठी लागू राहणार आहे, याबाबत जाणून घेऊया सविस्तर.

विमानसेवा बंद करण्यामागे नेमकं कारण काय?
हुती बंडखोरांनी गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियातील एअरपोर्टना टार्गेच केल्याचे दिसून येत आहे. सध्याच एअर इंडियाच्या AI2030 या विमानावर मिसाईल हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे असंख्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याचमुळे एअर इंडियाने खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिकीट काढलेल्यांचे काय होणार आहे, अनेक प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केलेले आहे, याच प्रवाशांना आता प्रश्न पडला आहे की पैसे परत मिळणार का? महत्त्वाचे म्हणजे एअर इंडियाने यावर स्पष्टीकरण ही दिले आहे.

हेही वाचा – गरबाप्रेमींना मेट्रोचा दिलासा! आता उशीर झाला तरी नो टेंशन; रात्री साडेबारापर्यंत मेट्रो सेवा राहणार सुरू

संबंधित प्रवाशांना आता दोन सुविधा दिल्या जात आहेत. ज्यामध्ये प्रवासी तिकिटाची तारीख ही पुढे ढकलू शकता किंवा प्रवाशांना हवे असल्यास रिफंडही घेवू शकता. त्यासाठी कोणताही कॅन्सलेशन चार्च लागणार नाही. शिवाय ज्यांना अर्जंट जायचे आहे, त्यांच्यासाठी कंपनीने दुसराही मार्ग दिलेला आहे. तुम्ही दुबई किंवा दोहा या कनेक्टिंग फ्लाइट घेऊनही सौदीला जाऊ शकता. तिकिटात तसे बदल करत दिले जात आहेत.

कोणती उड्डाणे रद्द? सेवा कधी सुरू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने सुरक्षेच्या कारणामुळे सौदीसाठी असलेली थेट विमान सेवा बंद केलेली आहे. या कंपनीने थेट 24 ऑक्टोबरपर्यंत सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. मात्र, 24 ऑक्टोबरनंतर विमान सेवा सुरू होईल का, याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number