नवी दिल्ली: मंगळवारी एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आढळून आलं. त्यानंतर आता आज पुन्हा दिल्लीहून बालीला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतल्याचे वृत्त आहे. परंतु, हे विमान पुन्हा परतण्याचे कारण थोडे वेगळे असून कंपनीने ते स्पष्ट केलं आहे. एअर इंडियाने याबाबत एक निवेदनही जारी केले आहे.
कंपनीने म्हटले आहे की, 18 जून 2025 2025 रोजी बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे दिल्लीहून बालीला जाणाऱ्या विमान क्रमांक AI 2145 ला दिल्लीला परतण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, विमान यशस्वीरित्या दिल्लीत उतरवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आहे.
हेही वाचा - 'अत्यंत वाईट सेवा...'; सुप्रिया सुळेंची एअर इंडियाबद्दल विमान वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार
दरम्यान, एअरलाईन्सने म्हटले आहे की, यानंतर व्यवस्थापनाने हॉटेलमध्ये सर्व प्रवाशांना राहण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्या कमी करता येतील. यासोबतच, प्रवाशांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत देण्यासोबत पुन्हा उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - अमेरिकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड
एअर इंडियाच्या अनेक उड्डाणे रद्द -
मंगळवारी एकाच दिवसात एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामध्ये अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा समावेश होता. याशिवाय, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणारी एक विमान कोलकाता येथे उतरावे लागले. याशिवाय, मंगळवारी संध्याकाळी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर 14 उड्डाणे वळवण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी खराब हवामानामुळे 400 हून अधिक उड्डाणे उशिरा किंवा वळवण्यात आली. तथापि यातील काही उड्डाणे रद्द करण्यात आली.