Thursday, July 17, 2025 02:04:09 AM

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूचं! व्हिएतनामला जाणाऱ्या विमान दिल्लीला परतले

दिल्लीहून व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटीला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. एअर इंडिया एअरलाइनने याबाबत माहिती दिली आहे.

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूचं व्हिएतनामला जाणाऱ्या विमान दिल्लीला परतले
Air India flight
Edited Image

नवी दिल्ली: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूचं असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी, दिल्लीहून व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटीला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. एअर इंडिया एअरलाइनने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, हो ची मिन्हसाठी उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान AI388 दिल्लीत सुरक्षितपणे परत असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या प्रवाशांना दुसऱ्या विमान आणि कर्मचाऱ्यांसह हो ची मिन्हला पाठवले जाईल.

दरम्यान, आज सकाळी दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमानही तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. इंडिगोचे विमान 6E2006 दोन तासांहून अधिक काळ आकाशात राहिल्यानंतर दिल्लीला परतले. इंडिगोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान पुन्हा सुरू करण्यापूर्वी विमानाची आवश्यक तपासणी केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांना लेहला नेण्यासाठी आणखी एका विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातात स्थळावर सापडले 70 तोळे सोने आणि 'या' वस्तू !

तांत्रिक बिघाडानंतर अनेक उड्डाणे रद्द - 

गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर तांत्रिक बिघाड दिसून आल्यानंतर शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच अनेक विमाने परत बोलावण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 12 जून ते 17 जून रोजी झालेल्या अपघातापासून, एअर इंडियाने एकूण 83 उड्डाणे रद्द केली आहेत. याशिवाय, एअर इंडियाने 18 जून रोजी 3 आंतरराष्ट्रीय उड्डाणेही रद्द केली आहेत.

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय! आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात

एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणात 15 टक्के कपात -  

तत्पूर्वी एअर इंडियाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. कंपनीने त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन्सची स्थिरता राखण्यासाठी, चांगली कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, ही कपात आता ते 20 जून दरम्यान लागू केली जाईल. 


सम्बन्धित सामग्री