Thursday, November 13, 2025 07:22:56 AM

हृदयद्रावक! आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू, दक्षिण भारतातल्या घटनेमुळे खळबळ

साधारणपणे 12 एकरवर पसरलेल्या काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात दूरदूरून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे शनिवारी मोठी गर्दी उसळते. यामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हृदयद्रावक आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी 9 भाविकांचा मृत्यू दक्षिण भारतातल्या घटनेमुळे खळबळ

Stampede at Venkateshwara Temple in AP : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिरामध्ये आज शनिवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) घटनेमुळे दक्षिण भारत पुन्हा एकदा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडू आणि बंगळूरूमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या.

चेंगराचेंगरी आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
साधारणपणे 12 एकरवर पसरलेल्या काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात दूरदूरून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे शनिवारी मोठी गर्दी उसळते. याच गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या दुःखद घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले, "या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू होणे अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो."

हेही वाचा - Kerala Big Achievement : शंभर टक्के साक्षरतेनंतर केरळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!; देशात विक्रम करणारे ठरले पहिलेच राज्य

जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश
मुख्यमंत्री नायडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर जलद आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांनी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि इतर उपाययोजनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे.

या घटनेतील जखमींबाबत ताज्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ भाविकांशिवाय अनेक भाविक जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर (Critical) आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, बचावकार्यही युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या जिल्हा प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - EV Car Viral Video : दीड लाखांच्या ई-रिक्षाने ओढली 15 लाखांची टाटा नेक्सॉन EV; व्हिडिओ व्हायरल


सम्बन्धित सामग्री