Saturday, February 08, 2025 03:44:28 PM

Artificial Intelligence For Farming
आता शेतीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पद्धतींचा वापर केला आहे. काही उपक्रम खाली दिले आहेत

आता शेतीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

शेती क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाय सुरू केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना माहितीपूर्ण आणि वेगवान निर्णय घेणे सुलभ झाले आहे.

शेतकऱ्यांचा डिजिटल साथीदार – ‘किसान ई-मित्र’

1) ‘किसान ई-मित्र’ हा एक AI-आधारित चॅटबॉट Chatbot असून, तो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसह विविध सरकारी उपक्रमांबद्दल माहिती देतो. हा बॉट अनेक भाषांमध्ये उपलब्ध असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोपी आणि त्वरित उत्तरे देतो.

दहावी-बारावी परीक्षा ‘ड्रोन’च्या नजरकैदेत! कॉपीप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

2) हवामान बदलामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने AI आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कीटक संसर्गाचे लवकर अंदाज वर्तवते, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर उपाययोजना करता येतात.

हेही वाचा:  महिला सन्मान बचत योजनेसाठी शेवटची संधी! गुंतवणुकीसाठी फक्त 31 मार्चपर्यंत वेळ

3) तांदूळ आणि गहू पिकांचे आरोग्य तपासण्यासाठी उपग्रह डेटासह (satellite data)  हवामान आणि मातीतील आर्द्रता मोजली जाते. याशिवाय, शेतातील प्रत्यक्ष छायाचित्रांवर AI आधारित विश्लेषण करून पीक स्थितीचा अचूक अंदाज वर्तवला जातो.या उपक्रमांमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम होत आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत ही महत्त्वाची माहिती दिली.

 


सम्बन्धित सामग्री