Bank Strike: आता बँक शाखेतील व्यवहार ठप्प होणार! बँकांचा तीन दिवसीय संप, कारण काय?

पाच दिवसांचा वर्किंग आठवडा, 5 मार्च 2024 चा द्विपक्षीय वेतन करार आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. उद्यापासून म्हणजेच 28, 29 आणि 30 सप्टेंबर असे तीन दिवस सरकारी बँका बंद राहणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच बँक शाखेतील व्यवहार ग्राहकांना करता येणार नाहीत. त्यांच्या या मागणीवरून केंद्र सरकार […]

Bank Strike: आता बँक शाखेतील व्यवहार ठप्प होणार! बँकांचा तीन दिवसीय संप, कारण काय?
Bank Strike

पाच दिवसांचा वर्किंग आठवडा, 5 मार्च 2024 चा द्विपक्षीय वेतन करार आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

उद्यापासून म्हणजेच 28, 29 आणि 30 सप्टेंबर असे तीन दिवस सरकारी बँका बंद राहणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच बँक शाखेतील व्यवहार ग्राहकांना करता येणार नाहीत. त्यांच्या या मागणीवरून केंद्र सरकार आणि बँक कर्मचारी संघटना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या संपात फक्त सरकारी बँकांचा समावेश असून, खासगी बँका सुरू राहण्याची शक्यता आहे.

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. मात्र, या संपामुळे बँक शाखांच्या सेवांवर परिणाम होणार असून, चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, कॅश काढणे यामध्ये ग्राहकांना मोठी अडचण येणार आहे. तरीही ATM, UPI आणि इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.

Mobile Recharge: मोबाइल वापरकर्त्यांना मोठा दिलासा; आता वर्षाला 13 ऐवजी करावे लागणार फक्त ‘इतके’ रिचार्ज

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number