Monday, December 08, 2025 04:06:09 PM

Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट तपासात मोठा ट्विस्ट; संशयित एक नव्हे तर दोन कारमध्ये आले होते

तपासात उघड झाले आहे की संशयितांकडे दुसरी एक लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट्स कार (DL10CK0458) देखील होती. ही कार दिल्लीतील राजौरी गार्डन येथील पत्त्यावर 22 नोव्हेंबर 2017 रोजी खरेदी करण्यात आली होती.

delhi blast update दिल्ली बॉम्बस्फोट तपासात मोठा ट्विस्ट संशयित एक नव्हे तर दोन कारमध्ये आले होते

Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. सुरुवातीला केवळ आय20 कारचा उल्लेख होता, मात्र आता तपासात उघड झाले आहे की संशयितांकडे दुसरी एक लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट्स कार (DL10CK0458) देखील होती. ही कार दिल्लीतील राजौरी गार्डन येथील पत्त्यावर 22 नोव्हेंबर 2017 रोजी खरेदी करण्यात आली होती.

हेही वाचा - Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत मोठा खुलासा; आरोपींचा जैश-ए-मोहम्मदशी थेट संबंध उघड

या पार्श्वभूमीवर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांना हाय अलर्ट करण्यात आले आहे. सर्व पोलिस ठाण्यांना, चौक्यांना आणि सीमावर्ती भागांना ही कार शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या पाच पथकांनी संशयास्पद कारचा शोध सुरू केला आहे. तपासात असेही समोर आले आहे की संशयित डॉ. शाहीन, डॉ. परवेझ आणि डॉ. मुझम्मिल हे तिघे ऑनलाइन एकमेकांशी संपर्कात होते आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते.  

हेही वाचा - Delhi Blast Update : मोठा खुलासा! देशातील 'ही' शहरेही होती हिटलिस्टवर; स्लीपर मॉड्यूल करण्यात आले होते सक्रिय

दरम्यान, मंगळवारी यूपी एटीएस आणि जम्मू पोलिसांनी डॉ. परवेझ आणि डॉ. शाहीन यांच्या घरांवर छापे टाकले. डॉ. परवेझ यांच्या घरातून पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे, गॅझेट्स, कीपॅड मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यातून अनेक संवेदनशील माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. डॉ. परवेझ यांच्या घराबाहेर सापडलेली कार सहारनपूर येथून खरेदी करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासाने या प्रकरणातील दहशतवादी जाळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री