Bihar became the first e-voting state
Edited Image
Bihar Became First E-voting State: बिहार देशातील पहिले ई-व्होटिंग राज्य ठरले आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी ई-मतदान सुरू करून इतिहास रचला. तथापी, पूर्व चंपारण येथील रहिवासी बिभा कुमारी यांनी मोबाईल फोनद्वारे मतदान करून देशातील पहिली डिजिटल मतदार होण्याचा मान मिळवला आहे. निवडणूक आयोगाने याला सुविधा, सुरक्षितता आणि मजबूत सहभागाचे प्रतीक म्हटले आहे.
नागरिकांनी केले ई-मतदान -
राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितले की, ई-मतदानासाठी पात्र असलेल्या 70.20% लोकांनी या सुविधेचा वापर केला, तर 54.63% मतदार पारंपारिक मतदान केंद्रांवर पोहोचले. सहा नगर पंचायती आणि नगरपालिका पोटनिवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी शांततेत निवडणुका पार पडल्या.
हेही वाचा - WHO ने भारताला दिले 'हे' खास प्रमाणपत्र! पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये दिली माहिती
सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 489 मतदान केंद्रांवर मतदान झाले, ज्यामध्ये 538 उमेदवार रिंगणात होते. ही प्रणाली पटना, बक्सर, भोजपूर, कैमूर, नालंदा, कटिहार, अररिया, सहरसा आणि पूर्व चंपारण यासारख्या पोटनिवडणुका सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. 30 जून रोजी मतमोजणी होणार असल्याचंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा - भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी! 3 जणांचा जागीच मृत्यू, 50 जण जखमी
ई-मतदान प्रणालीचा या नागरिकांना होणार फायदा -
दरम्यान, ई-मतदान प्रणालीचा विशेषतः वृद्ध, अपंग, गर्भवती महिला आणि स्थलांतरित कामगारांना मोठा फायदा होणार आहे. ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.