Nitin Gadkari On Solid Waste: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. 2027 च्या अखेरीस भारतातील सर्व घनकचरा रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. गुरुवारी PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 120 व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आतापर्यंत 8 दशलक्ष टन कचरा वेगळा करून रस्त्यांसाठी वापरण्यात आला आहे. ते म्हणाले, 'कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही. योग्य तंत्रज्ञान आणि नेतृत्वाने आपण कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करू शकतो.'
हेही वाचा - Ratan Tata First Death Anniversary : नेतृत्वाचा वारसा आणि दानशूर व्यक्तिमत्त्व रतन टाटांना देशवासियांकडून आदरांजली
दरम्यान, यावेळी गडकरींनी भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या प्रगतीचा अंदाजही दिला. त्यांनी सांगितले की, पुढील 5 वर्षांत भारताचा ऑटोमोबाईल उद्योग जगातील सर्वात मोठा होईल. सध्या 22 लाख कोटी (2.2 अब्ज डॉलर) आकारमानासह भारत अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2014 मध्ये, उद्योगाचे आकारमान 14 लाख कोटी (1.4 अब्ज डॉलर) होते. त्यांनी दावा केला की, भारताने जपानला मागे टाकले असून पर्यायी इंधन, जैवइंधन, इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG आणि हायड्रोजनमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उद्योगाला मोठी प्रगती मिळाली आहे.
हेही वाचा - Aircraft Collapses in Farrukhabad: फर्रुखाबादमध्ये टेकऑफदरम्यान खाजगी विमान कोसळले; सर्व प्रवासी सुरक्षित
मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना 45,000 कोटी अतिरिक्त उत्पन्न मिळाले असून, मक्याचा बाजारभाव 1,200 प्रति क्विंटल वरून 2,800 प्रति क्विंटल वर पोहोचला आहे. भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य साध्य केले आहे. आता अतिरिक्त उत्पादनाचा फायदा घेऊन इथेनॉल निर्यातीसाठी तयारी सुरू करण्याची वेळ आली आहे, असंही गडकरींनी यावेळी नमूद केलं.