Sunday, November 16, 2025 11:29:29 PM

Ratan Tata First Death Anniversary : नेतृत्वाचा वारसा आणि दानशूर व्यक्तिमत्त्व रतन टाटांना देशवासियांकडून आदरांजली

पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रतन टाटा यांचा चिरस्थायी वारसा आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचे स्मरण करण्यासाठी नागरिक, नेते आणि उद्योग जगतातील त्यांचे सहकारी त्यांना  सोशल मीडियावर आदरांजली वाहत आहेत.

ratan tata first death anniversary  नेतृत्वाचा वारसा आणि दानशूर व्यक्तिमत्त्व रतन टाटांना देशवासियांकडून आदरांजली

Ratan Tata Death Anniversary 2025 : उद्योग जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन एन. टाटा (Ratan N. Tata) यांची आज, 9 ऑक्टोबर 2025 रोजी पहिली पुण्यतिथी आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी (Visionary Leadership) आणि व्यवसाय करत असतानाही नैतिकतेने चालवत असलेल्या व्यावसायिक पद्धतींमुळे आणि दानशूर वृत्तीसाठी ते देशभरात खूप आदराने ओळखले जातात. आधुनिक भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक भूमिकेला आकार देण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रतन टाटा यांचा चिरस्थायी वारसा आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचे स्मरण करण्यासाठी नागरिक, नेते आणि उद्योग जगतातील त्यांचे सहकारी त्यांना  सोशल मीडियावर आदरांजली वाहत आहेत. 

देशभरातून वाहण्यात आली आदरांजली
रतन टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली वाहण्यात आली:
टाटा ट्रस्ट्सचे संदेश: टाटा ट्रस्ट्सच्या अधिकृत 'X'  हँडलवरून रतन टाटा यांच्या ब्लॅक सूटमधील प्रतिमेसह एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट करण्यात आला: "Remembering Ratan N. Tata, A Life of Purpose, A Legacy of Impact, December 28, 1937 - October 9, 2024. राष्ट्रीय प्रगतीच्या शक्तीत त्यांनी केलेले परोपकाराचे रूपांतरण हा वारसा नेहमीच आपला मार्गदर्शक प्रकाश राहील."

माध्यमांचा सहभाग: माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही (Ministry of Information and Broadcasting) श्रद्धांजली वाहिली. "दूरदर्शी उद्योगपती आणि दयाळू परोपकारी (Philanthropist) रतन टाटा यांचे स्मरण करताना, त्यांचे नेतृत्व भारतीय उद्योगाचे परिवर्तन करणारे आणि असंख्य जीवनांना स्पर्श करणारे ठरले," असे मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

सोशल मीडियावरील भावना: मेहुल कलावत नावाच्या 'X' युजरने लिहिले, "सर रतन टाटा... सोन्याच्या अक्षरात लिहिलेले नाव, माणुसकीसाठी बांधलेले हृदय. आज आपण केवळ एका व्यावसायिकाला नव्हे, तर ज्यांनी दयाळुता, सचोटी आणि राष्ट्राची सेवा करण्याची व्याख्या बदलली, अशा व्यक्तीला आठवत आहोत." तसेच, माही सिंग नावाच्या युजरनेही अशाच प्रकारची भावनात्मक श्रद्धांजली वाहिली.

कलाकृतीतून आदरांजली: प्रसिद्ध वाळूचे कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही या उद्योगपतीला आदरांजली वाहण्यासाठी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर हृदयस्पर्शी वाळूची कलाकृती (Sand Art Sculpture) साकारली.

हेही वाचा - Bhushan Gavai Video : भूषण गवई यांच्याबरोबर न्यायालयात नक्की काय घडलं? व्हिडीओ समोर

रतन टाटा: एक दूरदर्शी आयुष्य
28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन नवल टाटा हे नवल टाटा आणि सूनू कमिसरियत यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर, त्यांचे संगोपन त्यांच्या आजी लेडी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांच्या आजीच्या प्रभावामुळेच त्यांच्यात परोपकार आणि सार्वजनिक सेवेची मूल्ये खोलवर रुजली.

शिक्षण: त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1955 मध्ये त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
टाटा समूहातील कारकीर्द: रतन टाटांनी सुरुवातीला अमेरिकेत भविष्य घडवण्याचा विचार केला होता, परंतु आजीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते भारतात परतले. 1962 मध्ये त्यांनी टाटा समूहात आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. टेल्को (सध्याची टाटा मोटर्स) आणि टाटा स्टील सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी व्यावहारिक अनुभव घेतला.

नेतृत्व : 1974 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डावर आले आणि अखेरीस 1991 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची (Chairman) धुरा स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन युगाचा उदय झाला, ज्यात जागतिक विस्तार, नावीन्यता आणि नैतिक नेतृत्वाला महत्त्व देण्यात आले. त्यांनी 1991 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत अंतरिम अध्यक्ष (Interim Chairman) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

हेही वाचा - IndiGo Fined: इंडिगोला DGCA चा मोठा दणका! पायलट प्रशिक्षणातील त्रुटींसाठी ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड


सम्बन्धित सामग्री