Sunday, November 16, 2025 06:23:13 PM

IndiGo Fined: इंडिगोला DGCA चा मोठा दणका! पायलट प्रशिक्षणातील त्रुटींसाठी ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

नियमांनुसार पायलट प्रशिक्षणासाठी अधिकृत सिम्युलेटर वापरणे बंधनकारक आहे, कारण याच्यावर विमान सुरक्षेचे मापदंड अवलंबून असतात.

indigo fined इंडिगोला dgca चा मोठा दणका पायलट प्रशिक्षणातील त्रुटींसाठी ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

IndiGo Fined: देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनी इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा झटका दिला आहे. पायलट प्रशिक्षणात झालेल्या त्रुटींमुळे कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड कॅटेगरी-C एअरड्रॉम्सवरील प्रशिक्षणादरम्यान पात्र सिम्युलेटरचा वापर न केल्यामुळे लावण्यात आला आहे.

प्रशिक्षण नियमांचे उल्लंघन

डीजीसीएच्या तपासात आढळले की इंडिगोने काही पायलट प्रशिक्षण सत्रांदरम्यान नियमांनुसार आवश्यक पात्र सिम्युलेटरचा वापर केला नाही. 26 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीला नोटीस देण्यात आली होती. नियमांनुसार पायलट प्रशिक्षणासाठी अधिकृत सिम्युलेटर वापरणे बंधनकारक आहे, कारण याच्यावर विमान सुरक्षेचे मापदंड अवलंबून असतात. सुरक्षेच्या दृष्टीने पायलट प्रशिक्षणात तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - Cough Syrup Controversy: 'हा दोषारोपाचा खेळ नाही, तामिळनाडू कारवाईत अपयशी'; कफ सिरप वादावर केंद्राचे स्पष्ट विधान

दरम्यान, एअरलाइनने एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की, डीजीसीएच्या आदेशाविरुद्ध त्यांनी अपील दाखल केले आहे. इंडिगोने स्पष्ट केले की या दंडाचा त्यांच्या आर्थिक स्थिती, दैनंदिन कामकाज किंवा व्यावसायिक क्रियाकलापांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही सर्व नियामक प्रक्रियेचे पालन करत आहोत आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, असे इंडिगोने म्हटले आहे. 

हेही वाचा - Sahil Mohamed Hussain: ड्रग्ज प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास, गुजरातच्या मोहम्मद हुसेनचे युक्रेनमध्ये आत्मसमर्पण

तथापी, 8 ऑक्टोबर रोजी बीएसईवर इंडिगोचा शेअर 5,630.50 वर बंद झाला, जो मागील सत्रापेक्षा 0.59 टक्के नीचांकी होता. बाजार विश्लेषकांच्या मते, या दंडामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर किरकोळ परिणाम होऊ शकतो, पण तिच्या आर्थिक स्थितीवर किंवा ऑपरेशनल कामकाजावर मोठा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या मते, डीजीसीएचे हे पाऊल भारतीय विमान उद्योगात सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे आहे. पायलट प्रशिक्षणातील त्रुटी गंभीर मानल्या जातात, कारण त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर होतो.


सम्बन्धित सामग्री