नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board of Secondary Education (CBSE) कडून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी Admit Card लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी या Admit Card ची आतुरतेने वाट पाहत आहेत. बोर्डाकडून आधीच काही विद्यार्थ्यांसाठी Admit Card उपलब्ध करण्यात आले असून, आता नियमित विद्यार्थ्यांनाही ते कोणत्याही क्षणी उपलब्ध होऊ शकतात.
यंदाच्या CBSE Board Exams ची सुरुवात 17 फेब्रुवारी पासून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीचा कालावधी आता एक महिन्यापेक्षा कमी राहिला आहे. परीक्षेला बसण्यासाठी Admit Card हा अत्यावश्यक दस्तऐवज असून, त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. Admit Card मध्ये विद्यार्थ्यांचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, विषयांची माहिती आणि वेळापत्रक यासारखी महत्त्वाची माहिती नमूद असते.
हेही वाचा: E-Bus News : एसटीच्या ई-बस प्रकल्पाचे चाक चिखलात! गाजावाजा मोठा.. पण गाड्यांचा पत्ता नाही; कंत्राटदाराच्या मनमानीपुढे महामंडळ हतबल
Admit Card कधीपर्यंत उपलब्ध होणार?
CBSE साधारणपणे परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी Admit Card वेबसाइटवर उपलब्ध करून देते. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात Admit Card उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या काळात नियमितपणे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Admit Card उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर भेट द्यावी. वेबसाइटवर Class 10 किंवा Class 12 Admit Card चा लिंक उपलब्ध असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर Login प्रक्रिया पूर्ण करावी. Login झाल्यावर Admit Card स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर Admit Card Download करून त्याचा स्पष्ट प्रिंट्स काढून ठेवाव्यात. Admit Card मध्ये नाव, रोल नंबर, विषय किंवा परीक्षा केंद्राशी संबंधित कोणतीही चूक आढळल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या शाळेशी संपर्क साधावा.
Admit Card उपलब्ध झाल्याची माहिती शाळांकडूनही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला Admit Card Download करताना अडचण येत असल्यास, त्याने आपल्या शाळेतील प्रशासनाशी संपर्क साधावा. परीक्षेसंबंधी अचूक आणि अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी केवळ CBSE च्या अधिकृत वेबसाइटवरूनच अपडेट्स पाहाव्यात, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Septic Tank Rules : 'या बिल्डरांना थेट...'; उच्च न्यायालयाकडून बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश