मोठी बातमी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात CJP ची उच्च न्यायालयात धाव; याचिकेत केली ‘ही’ मोठी मागणी

पक्षाच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पोलिसांच्या या संपूर्ण कारवाईला पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे.
मोठी बातमी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात CJP ची उच्च न्यायालयात धाव; याचिकेत केली ‘ही’ मोठी मागणी
CJP High Court petition

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आयोजित आंदोलनापूर्वी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आता थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. पक्षाच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पोलिसांच्या या संपूर्ण कारवाईला पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच निदर्शकांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याबद्दल दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे.

विमानात धरपकड आणि जंतर-मंतरकडे मोर्चाची हाक

‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख कार्यकर्ते अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांना ते दिल्लीत दाखल होताच विमानातच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याशिवाय कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरातून अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी कडक निर्बंध लादले असले तरी सीजेपीने जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. यामुळे दिल्लीतील वातावरण कमालीचे तापले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे.

आंदोलक आणि कार्यकर्ते राजधानी दिल्लीत पोहोचू नयेत यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे 250 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल 45 महत्त्वाचे मेट्रो स्थानके पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीला उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांशी जोडणाऱ्या सर्व रस्ते सीमांवर मोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. गुरुग्राम, फरिदाबाद, पानिपत, गाझियाबाद आणि नोएडा येथून दिल्लीत येणाऱ्या सर्व मुख्य प्रवेशद्वारांवर हजारो पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

हेही वाचा –  लाठीमारापासून अश्रूधुरापर्यंत… आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना नेमके काय अधिकार असतात?

4 किमी परिसरात इंटरनेट बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत जंतर-मंतरच्या 4 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून आयोजित परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. या कडक निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version