‘आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला?’ दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेंना दिले दोन पर्याय

दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्यासमोर एक मोठा पेच निर्माण केला. "पोलीस कोठडीत राहून आंदोलनात सहभागी व्हायचे की अंत्यसंस्कारासाठी गावी हिंगोलीला जायचे, याचा निर्णय दीपके यांनी स्वतः घ्यावा," असा प्रस्ताव पोलिसांनी त्यांच्यासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला?’ दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेंना दिले दोन पर्याय
Abhijeet Dipke

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) तर्फे आयोजित जंतरमंतर आंदोलनाला प्रशासनाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मुंबईहून विमानावारे दिल्ली विमानतळावर उतरताच पक्षनेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. दीपके पोलिसांच्या ताब्यात असतानाच, हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी येथे त्यांच्या 85 वर्षीय आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके यांचे आजारपणाने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्यासमोर एक मोठा पेच निर्माण केला. “पोलीस कोठडीत राहून आंदोलनात सहभागी व्हायचे की अंत्यसंस्कारासाठी गावी हिंगोलीला जायचे, याचा निर्णय दीपके यांनी स्वतः घ्यावा,” असा प्रस्ताव पोलिसांनी त्यांच्यासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

निवडणूक प्रक्रियेतील कथित एसआयआर (SIR) अनियमिततेच्या मुद्द्यावरून सीजेपी पक्षाने ‘जंतरमंतर 2.0’ आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रशासनाने दिल्लीत प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण नवी दिल्ली परिसरात 30,000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले असून, आंदोलकांना ठेवण्यासाठी 20 तात्पुरती डिटेन्शन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. याशिवाय, सुरक्षेचे कारण देत दिल्लीकडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून 45 मेट्रो स्थानके पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर मध्य दिल्लीतील जनपथ आणि कर्तव्यपथ परिसरातील 4 किलोमीटरच्या क्षेत्रात 24 तासांसाठी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

हेही वाचा –जंतर-मंतरवर गोंधळ! अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात;‘आप’च्या अनेक नेत्यांची धरपकड

अजिंक्य शिंदेंकडे आंदोलनाचे नेतृत्व

पोलिसांच्या अटकेनंतरही आंदोलनाचा मार्ग थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त करत अभिजीत दीपके यांनी आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतील या अभूतपूर्व कडक निर्बंध आणि धरपकडीचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. राजधानी दिल्लीत झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्येही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करत आहेत. एका बाजूला आजीचे छत्र हरपल्याचे वैयक्तिक दुःख आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या आंदोलनाची राजकीय जबाबदारी, अशा दुहेरी पेचात अभिजीत दीपके अडकले असून या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number