दिल्लीत CJP चं आंदोलन तापलं; पोलिसांवर दगडफेक; 2 पोलीस कर्मचारी जखमी

राजधानी नवी दिल्लीतील जंतरमंतर आणि लुटियन्स परिसरात आयोजित आंदोलनाला शनिवारी अचानक हिंसक वळण मिळाले. 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' (PTI) च्या इमारतीजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या नाकेबंदीला विरोध दर्शवत थेट सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली.

दिल्लीत CJP चं आंदोलन तापलं; पोलिसांवर दगडफेक; 2 पोलीस कर्मचारी जखमी
PTI building stone pelting

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे दिल्लीसह पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राजधानी नवी दिल्लीतील जंतरमंतर आणि लुटियन्स परिसरात आयोजित आंदोलनाला शनिवारी अचानक हिंसक वळण मिळाले. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (PTI) च्या इमारतीजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या नाकेबंदीला विरोध दर्शवत थेट सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. या अचानक झालेल्या हिंसक हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळावरून सुमारे 50 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संसद मार्ग आणि पटेल चौक परिसरातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क करण्यात आल्या आहेत.

संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गांवर नाकेबंदी

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी जंतरमंतरच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सुमारे 50 आंदोलकांचा गट पीटीआय इमारतीजवळ एकत्र जमला होता. पोलिसांनी त्यांना अडवून पांगवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण परिसर वेढून दगडफेक करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलीस व्हॅनमधून ताब्यात घेतले. हे आंदोलक मूळचे कुठून आले होते आणि दगडफेकीमागे कोणाचा हात होता, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. संसद भवन आणि व्हीआयपी परिसराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतुकीवरही नियंत्रण ठेवले जात आहे.

हेही वाचा – जंतरमंतर आंदोलनाआधी मोठी कारवाई; अभिजीत दीपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं

चंदीगडमध्येही निदर्शने तीव्र

दुसरीकडे, दिल्लीतील हिंसक घटनेसोबतच पंजाबची राजधानी चंदीगडमध्येही मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. चंदीगडमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाच्या (AAP) वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले ‘आप’चे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाब पोलिसांनी चंदीगडमधील आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, दिल्ली आणि चंदीगडमधील या घटनांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number