केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ अपेक्षित, पाहा किती, कसा वाढणार पगार

ही वाढ मंजूर झाल्यास सध्या मिळणारा 60 टक्के महागाई भत्ता थेट 63 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ अपेक्षित, पाहा किती, कसा वाढणार पगार
money

DA Hike 2026: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत एक अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. येत्या दिवाळीच्या सणापूर्वी केंद्र सरकार जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ मंजूर झाल्यास सध्या मिळणारा 60 टक्के महागाई भत्ता थेट 63 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल. केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी असलr, तरी 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

दिवाळीआधी महागाई भत्ता आणि बोनसची मागणी
यंदा 8 नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून डीए आणि महागाई सवलतीची (DR) थकबाकी त्वरित जाहीर करण्याची मागणी लावून धरली जात आहे. 14 ऑक्टोबर रोजी ‘कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स’ने कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी 30 दिवसांच्या पगारा इतका बोनस (सुमारे 6,908 रुपये) आणि 11.4 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा उत्पादकता संलग्न बोनस (सुमारे 17,951 रुपये) जाहीर करण्यात आला आहे. मात्र, बोनस आणि महागाई भत्ता या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत.

3 टक्के महागाई भत्ता वाढल्यास पगाराचे गणित
महागाई भत्त्याची गणना ही कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर (Basic Salary) केली जाते. जर महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्के झाला, तर कर्मचाऱ्यांच्या मासिक आणि वार्षिक पगारात कशी वाढ होऊ शकते समजून घेऊ.
– 18,000 रुपये मूळ वेतन: दरमहा 540 रुपये तर वर्षाला 6,480 रुपयांची वाढ
– 25,500 रुपये मूळ वेतन: दरमहा 765 रुपये तर वर्षाला 9,180 रुपयांची वाढ
– 35,400 रुपये मूळ वेतन: दरमहा 1,062 रुपये तर वर्षाला 12,744 रुपयांची वाढ
– 44,900 रुपये मूळ वेतन: दरमहा 1,347 रुपये तर वर्षाला 16,164 रुपयांची वाढ
– 56,100 रुपये मूळ वेतन: दरमहा 1,683 रुपये तर वर्षाला 20,196 रुपयांची वाढ

हेही वाचा – आयकर विभागात 119 पदांवर मोठी भरती; 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज, किती मिळणार पगार?

थकबाकी आणि मागील महिन्यांचा हिशोब
हा सुधारित महागाई भत्ता 1 जुलै 2026 पासून लागू केला जाणार असल्याने, मंजुरी मिळाल्यानंतर सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकी (Arrears) एकत्र दिली जाईल. उदाहरणार्थ, 18,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची एकूण 1,620 रुपये थकबाकी मिळू शकते. या निर्णयामुळे ऐन सण-उत्सवाच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे.

आठवा वेतन आयोग आणि आगामी निर्णय
दुसरीकडे, आठवा वेतन आयोग आणि महागाई भत्ता वाढ हे दोन स्वतंत्र विषय आहेत. आठव्या वेतन आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आगामी मंत्रिमंडळ बैठकीवर केंद्रित झाले असून, सरकार दिवाळीपूर्वी ही खूशखबर अधिकृतपणे कधी जाहीर करते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा – टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात 40 ते 50 ‘नॉट-फॉर-प्रॉफिट’ रुग्णालये उभारणार; नोएल टाटा यांनी मांडला नवा मास्टरप्लॅन

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number