दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार? जाणून घ्या, पगार किती होईल

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या महागाई भत्ता वाढीच्या (DA Hike) अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
DA Hike
DA Hike

DA Hike Latest Update News: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या महागाई भत्ता वाढीच्या (DA Hike) अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दसऱ्यापूर्वीच सरकारकडून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी मोठी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दसरा उलटून गेल्यानंतरही कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लक्ष दिवाळीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आगामी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महागाई भत्ता 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

अहवालानुसार, यंदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ मंजूर होण्याचा अंदाज आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 60 टक्के महागाई भत्ता मिळत असून 3 टक्क्यांची वाढ झाल्यास हा भत्ता थेट 63 टक्क्यांवर पोहोचेल. महागाई भत्त्याचा हा दर ठरवताना सरकार औद्योगिक कामगारांसाठीच्या AICPI-IW निर्देशांकाचा विचार करते. ऑगस्ट 2026 मध्ये हा निर्देशांक 1.2 अंकांनी वाढून 154.4 वर पोहोचल्यामुळे कर्मचाऱ्यांना 3 ते 4 टक्क्यांचा फायदा मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

हेही वाचा – भारतीय रेल्वेमध्ये 2008 जागांसाठी बंपर भरती! ‘या’ निकषावर होणार थेट निवड; कधीपासून करता येणार अर्ज?

मूळ वेतनानुसार दरमहा पगारात होणार घसघशीत वाढ
जर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीला मंजुरी दिली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार (Basic Pay) दरमहा मिळणाऱ्या पगारात खालीलप्रमाणे वाढ दिसून येईल:
18,000 रुपये मूळ वेतन असल्यास: दरमहा 540 रुपये वाढ
25,000 रुपये मूळ वेतन असल्यास: दरमहा 750 रुपये वाढ
30,000 रुपये मूळ वेतन असल्यास: दरमहा 900 रुपये वाढ
40,000 रुपये मूळ वेतन असल्यास: दरमहा 1,200 रुपये वाढ

दरवर्षी दोनदा केली जाते घोषणा; सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा
याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये केंद्र सरकारने जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करून तो 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर नेला होता, तर जानेवारी 2026 मध्ये तो वाढवून 60 टक्के करण्यात आला होता. दरवर्षी सरकारकडून वर्षातून दोनदा महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने 3 टक्के ‘डीए’ वाढीची घोषणा केल्यास लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.

हेही वाचा – केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर; मतदान अन् निकालाची तारीख समोर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version