10 ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वीच CJP नेते अभिजीत दीपके, सौरव अन् रांका यांना दिल्ली पोलिसांचा मोठा दणका; क्राईम ब्रँचकडून…

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच चौकशीच्या धाडी आणि जंतर-मंतर आंदोलनाची परवानगी या दुहेरी अडचणींचा सामना करत सीजेपी नेते आपले आंदोलन पुढे नेण्याच्या तयारीत आहेत.

10 ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वीच CJP नेते अभिजीत दीपके, सौरव अन् रांका यांना दिल्ली पोलिसांचा मोठा दणका; क्राईम ब्रँचकडून…
Abhijit Dipke

CJP leaders Abhijeet Dipke Sourav Das Delhi Police Probe: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीत नियोजित असलेल्या आंदोलनापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी कायदेशीर दणका दिला आहे. 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणाची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने रीतसर चौकशी सुरू केली आहे. आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या चौकशीमुळे सीजेपीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

20 जुलैच्या संसद मार्च हिंसाचाराप्रकरणी BNS अंतर्गत गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी पार पडलेल्या आंदोलनादरम्यान अचानक हिंसाचार भडकला होता, ज्यामध्ये पोलिसांवर कथित हल्ले, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि तोडफोड झाली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात होता का, ही हिंसा पूर्वनियोजित होती की आंदोलनात काही समाजकंटकांनी घुसखोरी केली होती, याचा सखोल तपास क्राईम ब्रँच करत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर याप्रकरणातील 17 एफआयआर (FIR) रद्द करण्यात आले असले, तरी मुख्य तपासाचा फेरा अजूनही कायम आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या परवानगीवरून सीजेपी आणि पोलिसांत ताणतणाव
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने यापूर्वी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा केली. मात्र, दिल्ली पोलिसांच्या नवीन नियमांनुसार जंतर-मंतरवर कोणत्याही आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पोलिसांनी परवानगी नाकारूनही सौरव दास, अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका आंदोलनाच्या तयारीत व्यस्त असल्याने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – ‘जंतर-मंतरवर…’ ध्रुव राठीचं भारतात येताच मोठं आवाहन; अभिजित दीपकेसोबत प्रकाश राजही, मुख्य निवडणूक आयुक्तांना इशारा देत म्हणाले, ‘आली रे आली…’

कॅनॉट प्लेस येथे ‘इंडिया’ आघाडीचाही निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
दुसरीकडे, कथित निवडणूक घोटाळ्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दररोज दुपारी विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून, काल जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस (Connaught Place) येथे विरोधकांनी धडक दिली. विशेष म्हणजे या आंदोलनात पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रत्यक्ष सहभागी झाल्याने विरोधकांच्या या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे.

10 ऑक्टोबरच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच चौकशीच्या धाडी आणि जंतर-मंतर आंदोलनाची परवानगी या दुहेरी अडचणींचा सामना करत सीजेपी नेते आपले आंदोलन पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी आणि दुसरीकडे तरुणांची ‘सीजेपी’ संघटना या दोघांनीही निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंदोलनाला पोलीस कशी हाताळतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; दिल्लीतील निवास्थानाबाहेर 50 जवानांचा पहारा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number