Sunday, November 16, 2025 05:43:33 PM

SIR Electoral Rolls: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! बिहारनंतर देशभरातील 12 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ लागू

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती दिली.

sir electoral rolls निवडणूक आयोगाची मोठी घोषणा बिहारनंतर देशभरातील 12 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ लागू

SIR Electoral Rolls: बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, आता निवडणूक आयोगाने या उपक्रमाचा विस्तार देशभर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती दिली.

या विशेष मोहिमेचा उद्देश पात्र मतदारांना यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र किंवा डुप्लिकेट नावे वगळणे हा आहे. मतदार यादीतील विसंगती, चुकीची माहिती आणि एकाच नावाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एसआयआर उपयुक्त ठरणार आहे. तथापी, ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर आता 1000 मतदारांवर लक्ष केंद्रित करून अचूक माहिती अपडेट केली जाईल. बिहारमध्ये आधीच एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. 

हेही वाचा - Justice Suryakant: भारताला मिळणार नवे सरन्यायाधीश! न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत? वाचा त्यांचे चार ऐतिहासिक निर्णय 

दुसऱ्या टप्प्यातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश:
अंदमान आणि निकोबार बेटे, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल.

SIR मतदार यादी म्हणजे काय? 
‘एसआयआर' ही प्रक्रिया नवीन मतदार यादी तयार करण्यासाठी आणि जुन्या यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोग राबवतो. या प्रक्रियेत गणनाकर्ते घरोघरी जाऊन सर्व पात्र मतदारांची नावे नोंदवतात, तसेच मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतात. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत पूर्वीची मतदार यादी न पाहता नवी यादी शून्यापासून तयार केली जाते. निवडणूक आयोगाला जेव्हा असे वाटते की विद्यमान मतदार याद्या चुकीच्या आहेत किंवा त्यात मोठ्या प्रमाणावर फेरबदल आवश्यक आहे, तेव्हा एसआयआर राबवण्यात येतो. साधारणपणे हे अपडेट महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी केले जाते. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनते.  

हेही वाचा - CSIR UGC NET: यूजीसी नेट परीक्षेसाठी एनटीएकडून अंतिम मुदत जाहीर, उमेदवारांनी वेबसाइटवर अर्ज आजच करावा

दरम्यान, बिहारमध्ये अंतिम यादीत सुमारे 74.2 दशलक्ष मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. येत्या निवडणुकीत बिहारमध्ये दोन टप्प्यांत 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाचा दावा आहे की, या नवीन टप्प्यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वसनीय होईल. ज्यामुळे देशातील लोकशाही प्रक्रियेला अधिक बळ मिळेल.


सम्बन्धित सामग्री