Monday, November 17, 2025 12:08:12 AM

Fire at Building Near Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनाजवळील इमारतीला आग! अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्मदा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 19 या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरगुती वस्तूंमुळे आग लागली.

fire at building near rashtrapati bhavan राष्ट्रपती भवनाजवळील इमारतीला आग अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

Fire at Building Near Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 31 जवळील एका इमारतीला मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्मदा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 19 या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरगुती वस्तूंमुळे आग लागली. दुपारी 1:51 वाजता आगीची माहिती मिळाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर अवघ्या 20 मिनिटांत, म्हणजेच दुपारी 2:15 वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, 'आम्ही घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या. दुपारी 2:15 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.'

हेही वाचा - PM Modi : 'स्वदेशी, स्वच्छता, आरोग्य आणि प्रत्येक भाषेचा आदर..' पंतप्रधान मोदींचं दिवाळीनिमित्त देशवासियांना खास पत्र; म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर..'

पश्चिम दिल्लीत फटाक्यांमुळे इमारतीला आग

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत मंगळवारी रात्री पश्चिम दिल्लीतील मोहन गार्डन परिसरात एका चार मजली निवासी इमारतीला फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सात जणांना सुखरूप बाहेर काढले. मोहन गार्डन येथील निवासी घरात आग लागल्याची माहिती रात्री 9:49 वाजता पीसीआर कॉलद्वारे पोलिसांना मिळाली. द्वारका येथील पोलीस उपायुक्त (DCP) अंकित सिंह यांनी सांगितले की, इमारतीमधून तीन कुटुंबातील एकूण सात जणांना वाचवण्यात आले. यापैकी चार जणांना स्थानिक पोलिसांनी दोरीच्या मदतीने आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या आगमनापूर्वीच वाचवले.

हेही वाचा - Toll Gate Open : दिवाळी बोनस कमी मिळाल्याने टोल कर्मचाऱ्यांचा संताप; हजारो गाड्या शुल्काशिवाय सोडल्या! कंपनीला लाखोंचा फटका

उर्वरित तिघांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घराबाहेर काढले. वाचवण्यात आलेल्यांमध्ये हरविंदर सिंग (34), त्यांची पत्नी प्रिया (27), वीरेंद्र सिंग (32), त्यांची पत्नी प्रेमवधा, राखी कुमारी (40), त्यांची मुले वैष्णवी सिन्हा (15) आणि कृष्णा सिन्हा (10) यांचा समावेश आहे. सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री