देशातील IIT, IIM, AIIMS आणि NID संस्थांचा UGC च्या डिफॉल्टर यादीत समावेश; काय आहे यामागचं कारण?

. 'डिफॉल्टर' यादीत आयआयटी, आयआयएम, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) यासह 17 मोठ्या संस्थांचा समावेश आहे.<br/>

देशातील IIT, IIM, AIIMS आणि NID संस्थांचा UGC च्या डिफॉल्टर यादीत समावेश; काय आहे यामागचं कारण?
Edited Image

नवी दिल्ली: देशातील आयआयटी, आयआयएम, एम्स आणि एनआयडी संस्थांना यूजीसीने डिफॉल्टर यादीत समाविष्ट केले आहे. चार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि तीन भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) यांना रॅगिंग विरोधी नियमांचे पालन न केल्याबद्दल 'डिफॉल्टर' यादीत ठेवण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. रॅगिंग विरोधी नियमांचे पालन करण्याचे शपथपत्र सादर न केल्याबद्दल यूजीसीने देशभरातील 89 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'डिफॉल्टर' यादीत आयआयटी, आयआयएम, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) यासह 17 मोठ्या संस्थांचा समावेश आहे.

दरम्यान, 'डिफॉल्टर' आयआयटी संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे, आयआयटी खरगपूर, आयआयटी पलक्कड आणि आयआयटी हैदराबाद यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, आयआयएम बॉम्बे, आयआयएम रोहतक आणि आयआयएम तिरुचिरापल्ली यांचाही या यादीत समावेश आहे. तथापी, यूजीसी सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की, यूजीसीच्या निदर्शनास आले आहे की, त्यांनी जारी केलेल्या अनेक सूचना, रॅगिंगविरोधी हेल्पलाइन्सचे आवाहन आणि रॅगिंगविरोधी देखरेख संस्थेच्या थेट हस्तक्षेपानंतरही या संस्थांनी विद्यार्थ्यांचे अनिवार्य रॅगिंगविरोधी प्रतिज्ञापत्र आणि संस्थांचे अनुपालन प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. 

हेही वाचा – बिहार ठरले देशातील पहिले ई-व्होटिंग राज्य! नागरिकांनी घरातून मोबाईद्वारे केलं मतदान

यूजीसीचा शिक्षण संस्थांना इशारा – 

सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी रॅगिंगवरील यूजीसी नियम 2009 चे पालन करणे अनिवार्य आहे. अनुपालन न करणे हे केवळ यूजीसी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण करते, असंही मनीष जोशी यावेळी नमूद केलं आहे. तथापी, रॅगिंग नियमांचे अनुपालन न करणाऱ्या संस्थांना यूजीसीने इशारा दिला आहे. शिक्षण संस्थांनी जर 30 दिवसांच्या आत नियमांचे पालन केले नाही तर यूजीसीचे अनुदान आणि निधी काढून घेतला जाईल. 

हेही वाचा – WHO ने भारताला दिले 'हे' खास प्रमाणपत्र! पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये दिली माहिती

डिफॉल्टर यादीतील प्रमुख संस्था 
 
UGC कडून डिफॉल्टर जाहीर करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), हैदराबाद, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), नालंदा विद्यापीठ; इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) आणि भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता यांचाही समावेश आहे.    
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number