Monday, November 10, 2025 10:14:36 AM

Operation Sindoor: भारताने F-16 आणि JF-17 विमानांसह 4 ते 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा मोठा खुलासा

एअर चीफने सांगितले की पाकिस्तानी हवाई तळांवरील हल्ल्यांमुळे महत्त्वाची रडार सिस्टीम, कमांड आणि नियंत्रण केंद्रे, रनवे, हँगर्स आणि टार्मॅक गंभीर नुकसानाला सामोरे गेली.

operation sindoor भारताने f-16 आणि jf-17 विमानांसह 4 ते 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा मोठा खुलासा

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाच्या (IAF) 93 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत, एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी पाकिस्तानविरोधी ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले केले. एअर चीफने सांगितले की पाकिस्तानी हवाई तळांवरील हल्ल्यांमुळे महत्त्वाची रडार सिस्टीम, कमांड आणि नियंत्रण केंद्रे, रनवे, हँगर्स आणि टार्मॅक गंभीर नुकसानाला सामोरे गेली. विशेष म्हणजे, हँगर्समधील एफ-16 आणि JF-17 लढाऊ विमाने, सी-130 वाहतूक विमान आणि AWAC विमान नष्ट झाले. याशिवाय एक SAM (सरफेस-टू-एअर मिसाईल) प्रणालीही नष्ट झाली.

हेही वाचा - Bihar Train Accident: पूर्णियामध्ये भीषण अपघात! वंदे भारत ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

पाकिस्तानचा मोठा पराभव

हवाई युद्धातही पाकिस्तानला झळ बसली. भारतीय हवाई दलाने लांब पल्ल्याच्या हल्ल्यांद्वारे AWAC आणि SIGINT विमानं पाडली. तसेच, F-16 आणि JF-17 यांसारखी उच्च-तंत्रज्ञानाची 5 लढाऊ विमाने नष्ट केली. एकूणपणे पाकिस्तानचे 9-10 लढाऊ विमाने नुकसान झाले.

हेही वाचा -  India-China Air Services : भारत आणि चीनमधील विमानसेवा 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरु; परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

ऑपरेशनची वैशिष्ट्ये

एअर चीफ मार्शल एपी सिंगने सांगितले की, ऑपरेशन सिंदूर ही 1971 नंतरची सर्वात विनाशकारी कारवाई ठरली. हवाई दलाच्या अचूक, अभेद्य आणि संयमित हल्ल्यांमुळे, शत्रूला फक्त एका रात्रीत गुडघे टेकावे लागले. हे यश हवाई, जमीन आणि नौदल यांचा संयुक्त प्रयत्न असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. एअर चीफ मार्शलच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची हवाई शक्ती कमकुवत केली. या हल्ल्यांमुळे भारतीय सैन्याच्या स्वावलंबन आणि ताकदीची झलक दिसून आली.
 


सम्बन्धित सामग्री