Monday, March 09, 2026 02:31:18 AM

T20 World Cup: 'आम्ही 'मॅच मोड'मध्ये आलोय'; भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर तिलक वर्माने स्पष्टच सांगितलं...

5 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये या महासंग्रामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

t20 world cup आम्ही मॅच मोडमध्ये आलोय भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर तिलक वर्माने स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र आता चित्र स्पष्ट झाले असून 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये या महासंग्रामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाज तिलक वर्माने संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की खेळाडूंचे पूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. “सामन्याची अधिकृत पुष्टी होताच आम्ही तयारी त्या दिशेने वळवली. आमचा फोकस स्पष्ट आहे,” असे त्याने नमूद केले. भारत-पाकिस्तान सामना हा केवळ क्रिकेट सामना नसून भावनिक आणि स्पर्धात्मक दृष्टीनेही मोठा क्षण मानला जातो.

नामीबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तिलक म्हणाला की संघाला एक दिवस आधीच या सामन्याची माहिती मिळाली. त्यानंतर खेळाडू पूर्णपणे मॅच मोड मध्ये गेले आहेत. प्रत्येक संघावर बारकाईने नजर ठेवली जात असून मानसिक तयारी (Mental Preparation) ही सर्वात महत्त्वाची असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा: Bus Accident News: स्कूल बसने दुचाकीला चिरडले; पोलीस पित्यासमोरच दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

तांत्रिक तयारीबाबत (Technical Preparation) तिलकने सांगितले की संघ व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विरोधी संघातील गोलंदाज व फलंदाजांचा सखोल अभ्यास करत आहे. पिच कंडिशन्स, गोलंदाजी आणि इतर गोष्टी या सर्व बाबींवर विशेष काम सुरू आहे. मोठ्या सामन्यात लहान तपशीलही निर्णायक ठरू शकतात, याची जाणीव संघाला आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोएशेट यांनी मान्य केले की पाकिस्तान संघ काही काळापासून श्रीलंकेत सराव करत असल्याने त्यांना स्थानिक परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. मात्र भारतीय संघ या गोष्टीला आव्हान म्हणून स्वीकारत आहे. तिलक वर्माने स्पष्ट केले की संघ सध्या एकावेळी एकच सामना लक्षात ठेवून पुढे जात आहे. “टूर्नामेंटमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण फोकस आणि काटेकोर तयारी हेच आमचे सर्वात मोठे शस्त्र आहे,” असा आत्मविश्वास तिलक वर्माने व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: Bharat Bandh Today: आज 'भारत बंद'; बँका ते एसटी बसेस... आज घराबाहेर पडताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; नाहीतर होईल गैरसोय


सम्बन्धित सामग्री