Friday, March 13, 2026 10:25:20 PM

Bus Accident News: स्कूल बसने दुचाकीला चिरडले; पोलीस पित्यासमोरच दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

बस चालकाची चौकशी सुरू असून वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

bus accident news स्कूल बसने दुचाकीला चिरडले पोलीस पित्यासमोरच दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. थानिसंद्रा परिसरात शाळेच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना हेन्नूर वाहतूक पोलिसांच्या हद्दीत घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागनगौडा नावाचे पोलीस कॉन्स्टेबल किराणा दुकानातून दूध व इतर साहित्य आणण्यासाठी स्कूटरवरून निघाले होते. त्यांच्या सोबत त्यांची दोन वर्षांची मुलगी वर्षा आणि चार वर्षांची पुतणी भानूही होती. थानिसंद्रा पोलीस वसाहतीजवळील वळणावरून शाळेची बस वळत असताना तिने दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर तिघेही रस्त्यावर कोसळले. नागनगौडांनी कसाबसा स्वतःचा तोल सावरला; मात्र दुर्दैवाने वर्षा आणि भानू रस्त्यावर पडल्यावर बस त्यांच्या अंगावरून गेली. या भीषण अपघातात दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. नागनगौडांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: India US Trade Deal: ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; भारतासोबत गुपचूप झालेला 'हा' मोठा करार? जाणून घ्या नेमकं काय घडलं...

मृतांमध्ये वर्षा (वय दोन वर्ष) कॉन्स्टेबल नागनगौडांची मुलगी आणि भानू (वय चार वर्ष) त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी यांचा समावेश आहे. एका क्षणात दोन निरागस जीव गेल्याने पोलीस वसाहतीत हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या परिसरात वाहतूक नियंत्रण आणि शाळा बस चालकांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलीसांकडून अपघाताचा तपास (Investigation) सुरू असून बस चालकाची चौकशी करण्यात येत आहे. वळणावरील वेग, रस्त्याची स्थिती आणि सुरक्षिततेचे नियम (Traffic Safety Norms) यांचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

हेही वाचा: Divya Shinde Big Boss Marathi : बिग बॉस मराठी विरोधात उच्च न्यायालयात याचिका, दिव्या शिंदेचा बिग बॉसवर आरोप


सम्बन्धित सामग्री