Friday, March 13, 2026 10:19:26 PM

Iran-Israel War Effect on Gold Price : आधीच दीड लाखांच्या घरात असणारं सोनं अजून घाम काढणार; इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किंमतीचा भडका उडणार?

तसेच याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

iran-israel war effect on gold price  आधीच दीड लाखांच्या घरात असणारं सोनं अजून घाम काढणार इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किंमतीचा भडका उडणार

 सध्या तिसऱ्या युद्धाचा भडका उडेल असं चित्र समोर आलं आहे. आज म्हणजेच 28 फेब्रुवारीला इराण आणि इस्रायल या देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आता याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. तसेच याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मध्य-पूर्वेत अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईनंतर आता गुंतवणूकदारांमध्ये भू-राजकीय तणाव आणि अनिश्चितता वाढण्याची भीती असेल. या परिस्थितीत सोमवारी व्यापार पुन्हा सुरू झाल्यावर विविध मालमत्ता, विशेषतः इक्विटी, सोने आणि चांदी, कच्चे तेलासह वेगवेगळ्या बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Plastic Flower Ban: सावधान! आता प्लास्टिक फुलांची सजावट पडणार महागात; उत्पादन, विक्रीसह डेकोरेटर्स आणि मंगल कार्यालयांवरही होणार कारवाई 

या सर्व युद्धजन्य परिस्थितीमुळे, सोने आणि चांदीच्या बाजारातही अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचे पडसाद उमटू शकतात.  एप्रिलमधील सोन्याचा वायदा भाव एमसीएक्सवर 2262 रुपयांनी वाढून 1,61,971 रुपयांवर स्थिरावला तर, मे चांदीचे फ्युचर्स 10,037 रुपये वाढून 2,81,990 रुपयांवर उसळले.

हेही वाचा - BEST Bus New Route : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून बेस्टच्या वाहतूक मार्गात होणार मोठे बदल, 'या' मार्गावरून तुम्ही प्रवास करता का? 

त्याचप्रमाणे,  फेब्रुवारी महिन्यात सोनाच्या वायदा दरात 8.32% किंवा 12,451 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली. त्याचवेळी, एमसीएक्सवरील चांदीचा दर फेब्रुवारीमध्ये जवळपास 3% किंवा 9,300 रुपयांनी घसरला.


सम्बन्धित सामग्री