‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चादरम्यान जया बच्चन भडकल्या; रिपोर्टरचा माईक ढकलून दिला, व्हिडिओ व्हायरल

इंडिया ब्सॉक मोर्चादरम्यान खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या वागणुकीचा आणखी एक नमुना पाहायला मिळाला. एका रिपोर्टरने मोर्चाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी माईक पुढे केला असता, त्यांनी अतिशय रागात तो माईक बाजूला ढकलून दिला.

‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चादरम्यान जया बच्चन भडकल्या; रिपोर्टरचा माईक ढकलून दिला, व्हिडिओ व्हायरल
Jaya Bachchan

MP Jaya Bachchan Public Behavior: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने रान उठवले असून, विरोधकांनी आता थेट रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. मंगळवारी विरोधी पक्षांचे अनेक खासदार संसद भवनाच्या मकर द्वारावर एकत्र आले आणि तिथून पायी मार्च काढत निवडणूक आयोगाच्या ‘निर्वाचन सदन’ या मुख्यालयाकडे निघाले. निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यासाठी विरोधकांनी ही आक्रमक रणनीती आखली असून, वाढता तणाव पाहता संसद भवन ते निर्वाचन सदनादरम्यान सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

पत्रकाराने प्रश्न विचारताच जया बच्चन यांचा पारा चढला

याच मोर्चादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा संताप पाहायला मिळाला. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरने मोर्चाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जया बच्चन यांच्याकडे माईक पुढे केला असता, त्यांनी अतिशय रागात तो माईक बाजूला ढकलून दिला. रिपोर्टरने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर न देता ‘बोलणार नाही’ एवढे बोलून मौन बाळगणे पसंत केले आणि त्या तडक मागे वळून निघून गेल्या. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा…’; अभिजित दीपकेंचं पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान

मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आणि SIR प्रक्रियेवर बंदीची मागणी
विरोधी पक्षाचे सर्व नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत आहेत. यासोबतच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देणे आणि आगामी निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी (EVM) बॅलेट पेपरवर घेण्याची आक्रमक मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या विरोध प्रदर्शनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक वरिष्ठ नेते अग्रभागी दिसून आले.

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत

विशेष म्हणजे या मुद्द्यावरून देशातील तरुण वर्ग आणि राजकीय विश्लेषकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक आपले आंदोलन अधिक व्यापक रूप देण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांकडून या मार्चला कितपत पुढे जाऊ दिले जाते आणि विरोधकांची ही मोहीम येत्या काळात कोणते नवीन वळण घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – दिल्लीत विरोधकांचा अभूतपूर्व एल्गार; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षिय विरोधकांचा रस्त्यावर ठिय्या

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number