17 हजार फुटांवर विमान घिरट्या घालत राहिल, अचानक 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर वीज कोसळली अन्…

खराब हवामानामुळे पाटण्यावरून लखनऊला येणाऱ्या इंडिगो एयरलाईन्सच्या विमानावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं आहे.
IndiGo Flight Lightning Strike
IndiGo Flight Lightning Strike

उत्तर प्रदेशमधील लखनौमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. खराब हवामानामुळे पाटण्यावरून लखनऊला येणाऱ्या इंडिगो एयरलाईन्सच्या विमानावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेत विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं आहे.

टेकऑफच्या वेळी हे विमान अंदाजे 17,000 फूट उंचीवर असताना ही घटना घडली. यावेळी विमानात तब्बल 150 प्रवासी होते. त्यामुळे लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

हेही वाचा- ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा? राज्यात पुन्हा पावसाची चिन्हं; विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा, IMD अलर्ट

समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E925 हे विमान पाटण्यावरून लखनऊला येत होतं. टेल रजिस्ट्रेशन VT-IQZ चे हे विमान एयरबस A320-251N आहे. या विमानाने बुधवारी दुपारी 3:10 वाजता पाटणा विमानतळावरून उड्डाण केले होते. तर हे विमान दुपारी 4:20 वाजता लखनौ येथे पोहोचणार होते. मात्र हे विमान लखनऊ विमानतळावर संध्याकाळी 4.12 मिनिटांनी आठ मिनिटं लवकर पोहोचलं.

वेळापत्रकानुसार, हेच विमान 6E-6968 या क्रमांकाने सायंकाळी 5:05 वाजता लखनौहून अहमदाबादसाठी निघणार होते. दरम्यान खराब हवामानामुळे हे विमान 17,000 फूट उंचीवर घिरट्या घालत असताना विमानावर वीज पडली. यात विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वैमानिकाने चौधरी चरण सिंग यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. मात्र, या घटनेमुळे विमानात असलेल्या सुमारे 150 प्रवाशांमध्ये काही काळासाठी घबराट पसरली आहे. या घटनेनंतर विमान सेवेच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version